३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज ३ ऑगस्ट सकाळी ८:३० ते ४ ऑगस्ट सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासांसाठी लागू असेल.

कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागासाठी पावसाची संभाव्यता नोंदवण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण किनारपट्टीप्रमाणे पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहर व परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील.मात्र, पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.विशेषतः सातारा घाट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटक व स्थानिकांनी काळजी घ्यावी.तसेच कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू राहतील. घाटमार्गांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्येही पावसाचा इशारा

नाशिक शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होऊ शकते. तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मध्यम पाऊस अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यात तुलनेने हलक्या पावसाचा अंदाज आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि खबरदारीच्या सूचना

राज्यभरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. घाटमार्गाने प्रवास करताना रस्त्यांची स्थिती तपासूनच प्रवास सुरू करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे व स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार