ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

श्रावण महिन्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जावेळे येथील ऐतिहासिक व अत्यंत जागृत अशा ‘श्री स्वयंभू शिवशंकर जावळेश्वर देवस्थान’ परिसरात श्रावणारंभाची जय्यत तयारी सुरु असून अंतिम टप्प्यात आली आहे. श्रावणी सोमवार आणि शनिवारी मंदिरात होणाऱ्या विशेष रुद्राभिषेक, महापूजा आणि दर्शनासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे, श्रावण सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील नदीवर असलेल्या डॅमचा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

भाविकांसाठी योग्य नियोजन

श्रावण महिना हा देवाधिदेव महादेवाच्या आराधनेचा आणि भक्तीचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. श्रीवर्धन तालुक्यात तसेच संपूर्ण पंचक्रोशीत ‘जागृत देवस्थान’ म्हणून ख्याती असलेल्या जावेळे येथील स्वयंभू शिव मंदिरात दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते. यंदाही श्रावणात दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.

श्रावणी सोमवारी आणि शनिवारी मंदिरात होणारे जलाभिषेक, दुग्धाभिषेक, महापूजा व विशेष रुद्राभिषेक यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, दर्शनाची रांग व इतर सोयी-सुविधा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे.

निसर्ग-पर्यटन अन् डॅमवर तरुणाईची गर्दी

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जावेळे येथील नदीवरील डॅम पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. सभोवतालचे हिरवेगार डोंगर, खळखळणारा पाण्याचा प्रवाह आणि शांत वातावरण यामुळे पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळतेय. श्रीवर्धन तालुक्यात येणारे पर्यटक व स्थानिक नागरिक जावेळे डॅमला आवर्जून भेट देत आहेत.निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी आणि उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी हे ठिकाण सध्या तरुण वर्ग तसेच कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचे डेस्टिनेशन बनले आहे.

आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्राचा अनोखा संगम

जावेळे येथील श्री स्वयंभू शिवशंकर मंदिर आणि लगतचा निसर्गरम्य डॅम परिसर आता श्रीवर्धन तालुक्यातील एक प्रमुख आध्यात्मिक व निसर्ग-पर्यटन केंद्र म्हणून त्याची एक वेगळीच ओळख निर्माण होत आहे आहे. श्रावण महिना सुरू होण्याआधीच येथे भक्ती,उत्साह आणि पर्यटनाचा एक सुंदर आणि नयनरम्य संगम पाहायला मिळत आहे.

श्रावणाआधीच भक्तीरसात तल्लीन झालेलं हे ‘श्री स्वयंभू शिवशंकर जावळेश्वर देवस्थान’ श्रावणात किती बहार आणेल याचा अंदाज नक्कीच येतो.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार