कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

Watermelon death case:पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाचा झालेला दुर्दैवी मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्लेल्या या कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलींना अवघ्या काही तासांतच उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला आणि जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात कलिंगड खाण्याबाबत मोठी भीती पसरली होती. मात्र, आता या प्रकरणातील FDA म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, याने प्रकरणाला एक वेगळे वळण दिले आहे.
घटनेनंतर तत्काळ एफडीएने मृतांच्या घरातून कलिंगडाचे तुकडे, रात्री जेवणात असलेली बिर्याणी आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिम गोडवा किंवा घातक रंग मिसळण्यात आलेले नव्हते. इतकेच नाही, तर घरातील इतर अन्नपदार्थही मानकानुसार सुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. म्हणजेच, प्राथमिक स्तरावर अन्नात किंवा फळात कोणतीही भेसळ आढळलेली नाही.
मग प्रश्न असा निर्माण होतो की, जर अन्नात भेसळ नव्हती, तर एका सुदृढ कुटुंबाचा अशा प्रकारे अंत कसा झाला?
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, हा मृत्यू अन्नातील एखाद्या विशिष्ट ‘बॅक्टेरिया’मुळे किंवा इतर कोणत्याही अज्ञात विषारी घटकामुळे असू शकतो, जो प्राथमिक तपासणीत दिसून आला नसावा. कलिंगडात भेसळ नसल्याचे जरी सिद्ध झाले असले, तरी मृत्यूचे हे गूढ अद्याप कायम आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचे सत्य कलिना येथील फॉरेन्सिक लॅबच्या ‘व्हिसेरा’ अहवालानंतरच समोर येणार आहे.
तूर्तास, सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात ताजे अन्न आणि फळे खाण्याबाबत खबरदारी नक्की घ्या.
ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

तब्बल ₹४० कोटींच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज तस्करी आणि नेटवर्कशी संबंधित हाय-प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपीला न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब खान याचा जामीन…

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या त्या धक्कादायक घटनेचा आजही कोणाला विसर पडलेला नाही. नसरापूरच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची…

Leave a Reply

You Missed

कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

कर्जतनंतर आता नाशिकच्या चिमुकल्यांची कमाल! पाण्याच्या बॉटलचा माईक अन् रस्त्याच्या खड्ड्यांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’, व्हिडिओ व्हायरल

मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

छत्रीचा माईक अन् व्हायरल व्हिडिओचा इम्पॅक्ट! कर्जतच्या शाळकरी मुलींच्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मुळे काही तासांत रस्ता दुरूस्त, खड्डे बुजवले; नेटकऱ्यांकडून कौतुक

महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांना प्रशासकीय मार्गदर्शन अन् सायबर सुरक्षेचे धडे! श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे ‘दिशा महिला प्रभाग संघा’च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तब्बल 17 राज्यांना तुफान पावसाचा इशारा! मुंबईलाही हाय अलर्ट; पुढील 24 तास का सांगितले महत्त्वाचे?

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती