कार्यकर्ता ते उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपद! अ‍ॅड. विक्रम कपूर यांचा यशस्वी राजकीय आणि सामाजिक प्रवास, कार्याचा काँग्रेसकडून सन्मान

काँग्रेसचे एक निष्ठावान,अभ्यासू आणि कार्यतत्पर कार्यकर्ते अशी ओळख असणारे अ‍ॅड. विक्रम कपूर यांची उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. कोणतीही भक्कम राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ स्वतःचे कष्ट, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि तळागाळातील लोकांशी जपलेली बांधिलकी यांच्या बळावर त्यांनी हा टप्पा गाठला आहे.

माजी मंत्री तथा आमदार असलम शेख यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे सहकारी म्हणून अ‍ॅड. विक्रम कपूर ओळखले जातात.पण त्यांनी त्यांच्या कार्यातून आता एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या सांभाळताना नेहमीच अभ्यासूवृत्ती दाखवली आहे.

पक्षसंघटनेसाठी ग्राउंड लेव्हलवरून योगदान

अ‍ॅड विक्रम कपूर यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केली.पण तळागाळातील कामे,वॉर्ड स्तरावर अध्यक्षांपासून ते लोकप्रतिनिधींचे सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.

एवढंच नाही तर पक्षाचे धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास परिश्रम घेतले. काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

अ‍ॅड विक्रम कपूर यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय आहेत?

संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा

संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा ही दोन मुख्य गुण त्यांच्या स्वभावात आहेत.अ‍ॅड. विक्रम कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि काम करण्याच्या पद्धतीमधील हे महत्त्वाचे नियम आहेत.

शांत आणि संयमी

सोबतच शांत आणि संयमी स्वभावाने ते कायम सर्वांची मने जिंकतात. कोणताही गाजावाजा किंवा स्टंटबाजी न करता शांतपणे काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे.

सामाजिक बांधीलकी

वकील असल्यामुळे प्रशासकीय कामकाज, कायद्याच्या चौकटीतील प्रश्न आणि पालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यात त्यांची मोठी पकड आहे.कायदेशीर आणि प्रशासकीय कौशल्य देखील त्यांच्यात आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ती केवळ राजकीय जबाबदारी न मानता सामाजिक बांधीलकी म्हणून पार पाडतात.

नागरी प्रश्न आणि पाठपुरावा

मुंबईतील स्थानिक नागरिकांशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणे, रस्त्यांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून समस्या तडीस नेणे ही त्यांची काम करण्याची प्रमुख पद्धत आहे.

पक्षाकडून कार्याची दखल

काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रदीर्घ सेवा आणि निष्ठावंत कार्याची दखल घेत त्यांच्यावर उत्तर मुंबई जिल्हा महासचिवपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नवीन जबाबदारीमुळे उत्तर मुंबईत काँग्रेस पक्षाची बांधणी आणखी मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते, समर्थक आणि उत्तर मुंबईतील स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी