तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे.अन्न आणि औषध विभागाच्या धडक कारवाईमुळे सध्या फूड विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अस्वच्छ पदार्थ विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट आणि हॉटेलवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र आता हाच कारवाईचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळवण्यात आला आहे.

हायकोर्टाच्या कँटीनला टाळे

अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा हायकोर्टाने मंत्रालायाच्या कँटीनची पुन्हा तापसणी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसनंतर थेट हायकोर्टाच्या कँटीनला टाळे ठोकण्यात आले आहे.उच्च न्यायालयाच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेलं कँटीन अन्न व औषध प्रशासनाकडून बंद करण्यात आलं आहे. नियमांची पूर्तता होईपर्यंत संबंधित कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

दिंडोशी सत्र न्यायालय, मुंबई असे दोन कँटीन आहेत, त्यापैकी दुसऱ्या मजल्यावर असलेली ही कँटीन बंद करण्यात आली आहे. कँटीनवर झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. इतर शासकीय व निमशासकीय आस्थापनांमधील कँटीनची तपासणी सुरु आहे.

उपाहारगृहाची आवश्यक नोंदणीही झालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार

दरम्यान परवानगी न घेता उच्च न्यायालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या तीन उपाहारगृहांना एफडीएने गुरुवारी टाळे ठोकले, तर चौथ्या कँटीनमध्ये त्रुटी आढळल्याने नोटीस बजावली. तपासणीत संबंधित उपाहारगृहाने आवश्यक अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले. तसेच उपाहारगृहाची आवश्यक नोंदणीही झालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गुरुवारी ३० जुलै रोजी उच्च न्यायालयातील कँटीनवर धाड टाकली

एफडीएने केवळ खासगी हॉटेल, आस्थापनांवर कारवाई न करता मंत्रालय, उच्च न्यायालयातील कँटीनचीही तपासणी करावी, अशी सूचना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी केली होती.त्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी गुरुवारी ३० जुलै रोजी उच्च न्यायालयातील कँटीनवर धाड टाकली. तेव्हा तीन कँटीनसाठी परवानगीच नसल्याची बाब समोर झाली. यावेळी न्यायालयाच्या परिसरातील कँटीनमध्ये नियमांचे पालन होत आहे का,याची तपासणी करण्यात आली.

तीन कँटीनचे कामकाज थांबविण्याची नोटीस

एफडीए अधिकाऱ्यांनी या तीन कँटीनचे कामकाज थांबविण्याची नोटीस दिल्याचंही म्हटलं जात असून या आधी बाहेरून आणलेले पॅकेटबंद खाद्यपदार्थ कँटीनमध्ये देण्यात येत होते. मात्र, आता काही काळापासून कँटीनमध्येच ताजे खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार