विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या त्या धक्कादायक घटनेचा आजही कोणाला विसर पडलेला नाही. नसरापूरच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी ती घटना आठवली की सर्वांचाच संताप अनावर होतो. अशाच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसली पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये.

दोन सख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार

पिंपरी-चिंचवडमधील वाकडमध्ये एका  वर्षाच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर अत्याचार केल्याची घटना समोर येत आहे. शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या नराधमाने दोन सख्या बहिणींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोन सख्या बहिणींचं वय मिळालेल्या माहितीनुसार, १० आणि ५ वर्ष आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटना कशी समोर आली?

या मुलींच्या कुटुंबाच्या शेजारी राहत असलेला हा नराधम बायको आणि मुलासोबत राहत असल्याची माहिती समोर येत आहे. पीडितेचे आई – वडील, आजी -आजोबा असे सगळेच कामासाठी बाहेर केले… तर नराधमाची बायको आणि मुलगा देखील मजुरीसाठी घराबाहेर पडले. तेव्हा 10 वर्षांची मुलगी कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली, तेव्हा आजूबाजूला कोणी आहे की नाही पाहताच, नराधमाने पीडितेचे तोंड दाबून तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला.तोच प्रकार त्याने ५ वर्षांच्या चिमुकलीसोबतही केला. घडत असलेला हा सर्व प्रकार शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिला आणि पीडितेच्या आईला सांगितल्याचं म्हटलं जातं तसेच मुलींच्या पोटांत दुखत असल्याने पीडितेला विचारल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं.

पीडित मुलीच्या घरच्यांची आणि नागरिकांची वाकड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी 

नराधमाने पहिल्यांदाच असं कृत्य केलं नव्हतं. याआधी मे महिन्यात पहिल्यांदा त्यानंतर तीन वेळा.. असं चार वेळा नराधमाने 10 वर्षीय मुलीवर तोंड दाबून अत्याचार केले. एवंढच नाही तर, कुटुंबियांना तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा पीडितेने सांगितलं की, पाच वर्षीय बहिणीवर देखील नराधमाने तोंड दाबून अत्याचार केले.याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवण्यासाठी पीडित मुलीच्या घरच्यांनी आणि नागरिकांनी वाकड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी येत्या ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे.राज्याच्या…

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

अंधेरी परसिरात शनिवारी सकाळी म्हणजे (२६ जुलै)रोजी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. घरगुती वादातून, अगदी शुल्लक कारणावरून मुलाला राग अनावर झाल्याने थेट त्याच्या आई-वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या…

Leave a Reply

You Missed

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास;भारतासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट, पंतप्रधानांनीही केल अभिनंदन

नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

नागपूरमध्ये वाढता गँगवॉर; मित्रानेच केला घात, आधी इन्स्टाग्रामवर मैत्री केली अन् नंतर घाटावर बोलावून केली हत्या

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

नंदन नीलेकणीं कोण आहेत? NEET पेपरफुटीनंतर पंतप्रधान मोदींनी ज्यांच्यावर सोपवली परीक्षा सुधारणांची मोठी जबाबदारी,थक्क करणारे रेकॉर्ड!

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

धर्मेंद्र प्रधाननंतर नितीन गडकरी रडारवर का आहेत? राजीनाम्याची का होतेय मागणी?

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक

आषाढी एकादशी निमित्त छावा संघटनेनं राबवलेला सेवा उपक्रम चर्चेत; सर्वच स्तरातून कौतुक