ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी येत्या ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास स्थगिती दिली आहे.राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती केली आहे.

७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी

यावरून जिल्ह्यातील सुमारे ७५४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी वापरण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे मतदार यादीतील मयत, दुबार, स्थलांतरीत, तसेच बोगस मतदारांची नावे वगळून अद्ययावत होणारी मतदार यादीचा वापर होणार आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या, तसेच डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ७५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मतदार यादीला ऐनवेळी स्थगिती

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट संपून लवकरच लोकनियुक्त प्रतिनिधी येणार या आशेवर असलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराश आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीला ऐनवेळी स्थगिती दिल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेमुळे आयोगाने हा निर्णय घेतला असून,ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतांवर आता पाणी फिरले आहे.

मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी सध्या राबवण्यात

यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन लगेचच निवडणुकीचे बिगुल वाजणार होते. या पार्श्वभूमीवर गावागावांत इच्छुक उमेदवारांनी बैठका,कॉर्नर सभा, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. मात्र, मतदार याद्या दोषमुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी सध्या राबवण्यात येत असलेली ‘एसआयआर’ मोहीम पूर्ण झाल्यानंतरच अद्ययावत विधानसभा मतदारसंघ निहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरली जावी,अशी विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

‘एसआयआर’ मोहिमेची भर पडली

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, चिन्ह वाटप आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू असतानाच आता या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण पुन्हा ‘वेट अँड वॉच’ गेले आहे. अतिवृष्टी आणि सणासुदीच्या काळासोबतच आता ‘एसआयआर’ मोहिमेची भर पडल्याने, नवीन अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे नवे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार