पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला असून, आसाममध्ये मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे, तर नागालँडसह इतर पर्वतीय भागांत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने २८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत आसाममध्ये बुडून आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ७५ झाली आहे.

मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला

आसाम पूर आणि नागालँड भूस्खलन आसाममधील पुरामुळे मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला असून. एकट्या शिवसागरमध्ये २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सात जिल्हे अजूनही पुराच्या तडाख्यात सापडलेत. दरम्यान, नागालँडच्या मोकोकचुंगमध्ये भूस्खलनामुळे भाड्याचे घर कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला.आसाममधील नद्यांना पूर आला असून,सात जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, नागालँडच्या डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे भूस्खलन होत आहे.

लोकांना मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या, राज्यातील शिवसागर, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव, सोनितपूर आणि कामरूप महानगर हे सात जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

आसाममधील पूरस्थितीबाधित क्षेत्र:

राज्यातील शिवसागर, चाराइदेव, गोलाघाट, जोरहाट, नगाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रोपॉलिटन) हे सात जिल्हे पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत.

नागरिक आणि गावे: सुमारे ३ लाख ३२ हजारहून अधिक नागरिक आणि ६२२ गावे पुराच्या विळक्यात अडकली आहेत.

शेतीचे नुकसान: जवळपास ४५,३४१ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आणि पिके पाण्याखाली गेली आहेत.

नद्यांची स्थिती: नुमालीगढ येथील धनसिरी नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

३.३२ लाख लोकांना फटका, ६२२ गावं पाण्याखाली

६२२ गावं पुरामुळे बाधित झाली आहेत. तब्बल ३,३२,६३९ नागरिक या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. अनेक भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं आहे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. ४५,३४१.९८ हेक्टरवरील पिकं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. धनसिरी नदी नुमालीगड येथे अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शेकडो किलोमीटरचे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने संपर्क तुटला आहे.

आर्थिक मदत: मृतांच्या वारसांना एकूण ९ लाख रुपयांची मदत (अनुदान) जाहीर करण्यात आली आहे.

वाहतूक आणि मदतकार्य: एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि प्रशासन मदत साहित्य पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. मदत सुरु आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार