जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

मुंबई, 29 मे 2025:
जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 मुंबईत दिमाखात पार पडला. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा व्हिडिओ प्रदर्शनाद्वारे गौरव करत सन्मानित करण्यात आले. या भव्य व्यासपीठामुळे सन्मानितांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि अभिमान अविस्मरणीय ठरला.

सोहळ्याला मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय पाटकर, आमदार हरून खान, एकदा मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद, प्रभात समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, भाजपा प्रवक्ते विनोद शेलार, अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम, काँग्रेस महाराष्ट्र सचिव भावना जैन, माजी नगरसेविका अनिता बागवे, दिग्दर्शक दीपक राणे, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे संस्थापक आकाश रणधीर, लक्ष्मण डोंगळे, आणि माता रमाई महिला मंडळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विजय पाटकर म्हणाले, “संपादक अमोल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जागृत महाराष्ट्र जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी अथक कार्य करत आहे. हे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे.”
आमदार हरून खान यांनी जागृतच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
संगीता संजय सुतार यांनी सांगितले, “जागृत महाराष्ट्र समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे.”
विनोद शेलार यांनी नमूद केले, “मर्यादित साधनांमध्येही जागृत महाराष्ट्र समाजसेवकांना एकत्र आणून त्यांचा सन्मान करते, हे खूप मोठे योगदान आहे.”
संजय मानाजी कदम यांनी म्हटले, “जागृत महाराष्ट्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर आहे.”

खालील व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले:
1. अंजली पटेल– जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
2. रेश्मा राजन – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)

4. संकेत माने– जागृत आदर्श दिग्दर्शक,लेखक
5. गुंजनताई गोळे – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
6. नितेश कराळे मास्तर – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
7. योगेश राजेंद्र चव्हाण – जागृत समाजसेवक पुरस्कार
8. मारुती नागोराव घोटरे – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (प्रविका फाउंडेशन)
9. अॅड. शिवाजी धनगे व अॅड. वनिता – जनसेवा ओल्ड एज – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
10. बापू शांताराम परब – जागृत आदर्श कृषिमित्र पुरस्कार
11. राकेश चौधरी – जागृत आरोग्य मित्र पुरस्कार
12. विशाल गंगाधरराव दादेवाड – जागृत समाजसेवक पुरस्कार
13. लक्ष्मण डांगले – जागृत आदर्श उद्योजक पुरस्कार
14. वैशाली निसार अली सय्यद महाडिक– जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
15. दीपक संदानशिव – जागृत आदर्श शिक्षक पुरस्कार
16. नीला दिगंत चंपाणेरी – जागृत आदर्श समाजसेविका पुरस्कार
17. भानजी मुलजी वाला – जागृत जनसेवा पुरस्कार
18. झाहीद शेख – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
19. गायत्री विजयन नायर – जागृत आदर्श खेळाडू पुरस्कार
20. पूजा पांडे– जागृत आदर्श कलाकार पुरस्कार
21. हरिनाथ यादव – जागृत आदर्श शोध पत्रकारिता पुरस्कार
22. रेहाना शेख – जागृत आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार (आसरा महिला वेल्फेअर)
23. बलदेव खुमार– जागृत साहित्य पुरस्कार
24. सबा खान – जागृत समाजसेविका पुरस्कार

जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल चे संपादक अमोल शोभा गौतम भालेराव, संचालक सुरज भालेराव, कार्यकारी संपादक पंकज हेलोडे, आणि गजानन बनसोड यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

    सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा. शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा…

    Leave a Reply

    You Missed

    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    • By Admin
    • February 27, 2026
    मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    • By Admin
    • February 23, 2026
    मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    • By Admin
    • February 13, 2026
    “झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    • By Admin
    • February 8, 2026
    2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    ‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६