“राज-उद्धव-शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना” – गजानन कीर्तीकर यांचा मोठा संदेश, भाजपवरही निशाणा

शिवसेनेच्या एकसंघतेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आणि शिंदे गटातील शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना आहे. आम्ही ज्या शिवसेनेसाठी लढलो, ती पुन्हा उभी राहण्यासाठी ही तिघांची एकता अत्यावश्यक आहे.”

बाळासाहेबांचा वारसा आणि शिवसेनेचं विभाजन

गजानन कीर्तीकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही त्यांनी राज आणि उद्धव यांच्यातील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाचे विभाजन झाले आणि शिवसेना व मनसेमुळे मूळ विचारधारेला धक्का बसला. आज शिवसेना दोन भागांमध्ये विभागली गेली आहे — एकनाथ शिंदेंची भाजपसोबत असलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील शिवसेना.

अटी योग्य – पण विचारधारा पुन्हा एक करणे गरजेचे

राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, ही अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. दोघांनी काही अटी घातल्या आहेत, त्या योग्यच आहेत, कारण एक मजबूत शिवसेना तयार करण्यासाठी काही स्पष्ट भूमिका आवश्यक असतात. गजानन कीर्तीकर म्हणतात की, “आज शिवसेना भाजपप्रणित आणि काँग्रेसप्रणित झाली आहे, पण शिवसैनिकांना हवी आहे ती बाळासाहेबांची मूळ विचारधारा.”

शिंदेंनाही सोबत यावं लागेल

“जर शिवसेना पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांवर उभी करायची असेल, तर राज आणि उद्धव यांच्यासोबत शिंदेंनीही यावं लागेल,” असं मत व्यक्त करत कीर्तीकर यांनी तिघांच्या एकत्र येण्यावर भर दिला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व, आक्रमक भूमिका, मराठी अस्मिता आणि राष्ट्रीयत्व यांचे प्रतिनिधित्व करणारी शिवसेना पुन्हा उभी करायची असेल तर ही त्रिमूर्ती एकत्र येणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

भाजपवर निशाणा – “विभाजित शिवसेना भाजपला हवी आहे”

गजानन कीर्तीकर यांनी भाजपवरही परखड टीका केली. “भाजपला शिवसेना एकत्र हवी नाही, त्यांना ती विभाजितच हवी आहे. उद्धव ठाकरेंनी सोबत दिली, आता शिंदेंनी दिली, पण अखंड शिवसेना नसल्यामुळे भाजपला पूर्ण ताकद मिळालेली नाही. त्यामुळे भाजपच्या डावपेचात शिवसेनेचं एकत्र येणं घातक ठरेल, म्हणून ते याला विरोध करतील,” असं ते म्हणाले.

अखंड शिवसेनेसाठी पुढाकार घेणार – गजानन कीर्तीकर

कीर्तीकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मी बाळासाहेबांसोबत अनेक वर्षं काम केलंय. मला अधिकार आहे. मी राज, उद्धव आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन. पुन्हा आमचे जुने दिवस येण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील.”

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला.…

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावरून सुरू झालेली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत धडकलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ सध्या…

    Leave a Reply

    You Missed

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई