रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे.नेरुळच्या सेक्टर २० मधील मारुती बाळू भगत शाळा क्रमांक १० येथे हे शिबिर उत्साहात पार पडलं. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी,या हेतूने आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रक्तदात्यांचे कौतुक 

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक करत आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून अभिनंदन केले. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता नायडू, युवक जिल्हाध्यक्ष इंद्र शेडगे आणि सरपंच राजेंद्र घोसाळकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळावी तसेच समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात एकूण ९७ जणांचा सहभाग

या शिबिरात एकूण ९७ जणांनी सहभाग नोंदवला, ज्यापैकी ५८ जणांनी यशस्वीरीत्या रक्तदान केले. विशेष म्हणजे ७ महिला रक्तदात्यांनीही यामध्ये सहभाग घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडली.तर ३९ जणांना विविध कारणांमुळे रक्तदान करता आले नाही. विशेष म्हणजे ७ महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला.

मुंबईतील दादर येथील शुश्रुषा सिटिझन्स को-ऑप. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरात रक्त संकलनाचे काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. भरत जाधव, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती अनिता नायडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. इंद्र शेडगे, सरपंच श्री. राजेंद्र घोसाळकर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू

काळसूर ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष किशोर सावकार आणि सचिव सुरेश घोसाळकर यांनी सांगितले की, एका व्यक्तीने केलेले रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते. यापूर्वीही या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम आणि जनजागृती रॅली यांसारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. आगामी काळात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यांसारखे पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

 गरजू लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

आयोजकांनी सांगितले की, भविष्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे, गरजू लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी म्हणून अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे, या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे कौतुक करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त केलं. एका व्यक्तीने केलेले रक्तदान अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकतं. त्यामुळे समाजातील अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.

तसेच या शिबिरास मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, वैद्यकीय टीम, पदाधिकारी व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच