तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच! ब्लिंकिटच्या गोदामावर FDA ची धाड, झुरळांचा वावर अन्…अधिकारीही चक्रवाले

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाकडून कारवाया धडाका सुरूच आहेत. आता मुंबईतील दहिसर आणि मालाडमध्ये दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दहीसर येथे बनावट दूध कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तसेच अमूल, गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट दूध विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर, मालाडमध्ये ब्लिकिंट कमर्शिअलच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांचा परवाना तात्काळ निलिंबत करण्यात आला आहे.

दूध तयार करणाऱ्या टोळीवर धाड 

एफडीएकडून मुंबईच्या दहिसर पूर्व परिसरातील बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा कक्ष-१२ ने कारवाई केली आहे. नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्या कापून त्यातील दूध काढून अस्वच्छ पाणी मिसळले जात होते, त्यानंतर पिशव्या पुन्हा सील करून अस्सल दूध असल्याचे भासवून विक्रीची तयारी केली जात होती. याप्रकरणी, कारवाईत 4 पुरुष आरोपींना अटक करण्यात आले आहे.

ब्लिंकिटच्या गोदामावर धाड, मोठी कारवाई

मुंबईतील मालाड परिसरातील Blink Commerce Pvt. Ltd. च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी FDA अधिकाऱ्यांकडून गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गोदामात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली.अन्न सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या FIFO आणि FEFO या मानक पद्धतींचा वापर साठवणुकीदरम्यान केला जात नव्हता. गोदामात अन्नपदार्थांची हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती, तसेच त्याबाबतची कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. कचऱ्याची योग्य विल्हेवाट, दैनंदिन स्वच्छता आणि देखभालीमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

झुरळांचा वावर अन् कीटक व उंदीर, बरीच अस्वच्छता

भाजीपाला आणि फळांच्या साठवणुकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुरळांचा वावर आढळला. यामुळे अन्नपदार्थ दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कीटक व उंदीर नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा तिथे कार्यरत नव्हती. गोदामात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती होती. थेट जमिनीवर अन्नपदार्थ ठेवण्यात आले होते, तसेच कोल्ड स्टोरेजची नियमित स्वच्छता केली जात नव्हती. कोल्ड रूमसह गोदामाच्या विविध भागांत मुदतबाह्य झालेले आणि खराब झालेले पॅकबंद अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते.

FDA ची कडक कारवाई आणि इशारा

दरम्यान,या सर्व गंभीर बाबींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 नुसार तसेच संबंधित नियमांनुसार तात्काळ कारवाई केली आहे. परवाना निलंबित करण्यात आल्यामुळे या गोदामातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, पुरवठा किंवा वितरण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच पुढील तपासणीत अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा FDA कडून देण्यात आला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू