मुंबई-पुणे प्रवास करणार आहात? मग आधी ही बातमी वाचा, 12 ऑगस्टला मिसिंग लिंक बंद; काय आहे कारण ?

12 ऑगस्टला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक तीन तास बंद राहणार आहे. पुणे-मुंबई वाहतूक जुन्या घाट मार्गाने वळवण्यात येणार असून वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या मार्गिकेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासह येथे माॅकड्रिल घेण्यात येणार आहे. या कामासाठी ही मार्गिका बुधवारी दुपारी तीन तास बंद राहणार असून या दरम्यान वाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट परिसरातून वळविण्यात येणार आहे.

मिसिंग लिंकवरील वाहतूक बंद 

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बुधवारी १२ ऑगस्ट २०२६ जर तुम्ही प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी पाहा. उद्या बुधवारी १२ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टींग लिंकवरील म्हणजे मिसिंग लिंकवरील वाहतूक ३ तास बंद असणार आहे .पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका बुधवारी तीन तासांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. देखभाल-दुरुस्ती आणि मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना जुन्या मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाच्या घाट विभागाकडून वळवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी नियोजित रस्ताबंदीच्या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि वाहतुकीच्या व्यवस्थेशी सहकार्य करावे.

वाहनांना जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून वळवणार

12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत देखभाल-दुरुस्तीची कामे तसेच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र मिसिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे केवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर या वाहतूक बदलाचा परिणाम होणार आहे.

अडचण आल्यास कुठे संपर्क कराल?

दरम्यान या कालावधीत वाहनचालकांना काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी किंवा महामार्ग पोलीस विभागाशी संपर्क साधू शकता. त्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्ष : 9822498224
महामार्ग पोलीस विभाग : 9833498334

या दोन संपर्क क्रमांकावर तुम्ही मदत मागू शकता.

वाहनचालकांनी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक बंद राहणार.
पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गाने वळवली जाणार.
मुंबईकडून पुण्याकडे जाणारी कनेक्टिंग लिंकची मार्गिका सुरू राहणार.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.
आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या नियंत्रण कक्ष आणि महामार्ग पोलीस क्रमांकावर संपर्क साधता येईल.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू