VIDEO!मुंबईतील विलेपार्लेत अग्नितांडव; उच्चभ्रू इमारतीला भीषण आग, अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह एका महिलेचा मृत्यू

मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावर मंगळवारी दि.११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने रात्री १ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं आहे.

इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग

विलेपार्ले पश्चिम येथील बाप्टिस्टा मार्गावर सेंट झेवियर्स स्कूलजवळ असलेल्या शांता भवन या तळमजला अधिक १२ मजली इमारतीत ही घटना घडली. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता इमारतीच्या ११व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली.

आगीची तीव्रता प्रचंड होती. अग्निशमन दलासह पोलीस, वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

घरातील साहित्य आणि स्वयंपाकघरातील वस्तू सर्व जळून खाक

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, ११व्या मजल्यावरील ११०१ आणि ११०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये सुमारे ४ हजार चौरस फुटांच्या परिसरात आग पसरली होती. इलेक्ट्रिक वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणांसह एसी, सोफा, बेड, फॉल्स सीलिंग, घरातील साहित्य आणि स्वयंपाकघरातील वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अग्निशमन दलाने बचावकार्य करत बाधित नागरिकांना बाहेर काढले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटनेत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह एकाचा मृत्यू

या दुर्घटनेत अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. जखमींपैकी पार्थ (३२) आणि हिरेन (६४) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यशस्वी (३३) आणि अभिषेक यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे (३०) आणि शिवम द्विवेदी (२९) हेही जखमी झाले होते. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आलं.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश

अग्निशमन दलाकडून जवळपास तीन तास आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळालं. दरम्यान,आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सविस्तर तपासानंतर आगीचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच