
बिदर रोडवरील उड्डाण पुलावर गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला. तादलापूर येथील रहिवासी शिवाजी मोहन म्हैत्रे (वय ३९) हे रस्त्यावरून जात असताना, पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात हलवला. संबंधित ट्रॅव्हल्सचे वाहन क्रमांक MH-24 AU-1919 असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपघात कशामुळे झाला, ट्रॅव्हल्स चालकाचा दोष किती, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे तादलापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे