अंधेरीत ड्रग्स माफियांकडून थरारक पाठलाग, ४ जणांना गाडीने उडवलं – दया नायक घटनास्थळी उपस्थित

अंधेरीच्या म्हात्रे मैदानाजवळ आज सकाळी मुंबईत एक मोठी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्रग्स माफियांचा पाठलाग करत असताना आरोपींनी भरधाव वेगाने गाडी चालवून चार नागरिकांना उडवल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, याप्रकरणाचा तपास जुहू पोलीस करत आहेत.

सुरुवातीच्या माहितीनुसार, सकाळपासूनच काही संशयित आरोपी म्हात्रे मैदान परिसरात फिरताना स्थानिकांनी पाहिले होते. पोलिसांना आधीच इनपुट मिळाल्याने त्यांनी त्या दिशेने हालचाल सुरू केली होती. आरोपी बांद्राहून निघाल्यापासून त्यांचा पाठलाग सुरू होता. मात्र अंधेरीतील म्हात्रे मैदानाजवळ आरोपींच्या गाडीने नियंत्रण सुटल्यामुळे त्यांनी चक्क तीन ते चार नागरिकांना उडवलं.

घटनास्थळी प्रसिद्ध पोलीस अधिकारी दया नायक तपासासाठी दाखल झाले आहेत. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात येत असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.

आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी चार ते पाच बॅग्स जप्त केल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स व रोकड असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ड्रग्स मोजण्यासाठी वापरलेला वजन काटा खूप मोठा असल्याने हजारो किलो ड्रग्स असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पंचनामा प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  • Related Posts

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    महाराष्ट्रासह देशभरात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुली आहेत असे सांगून अनेक इच्छुक…

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…

    Leave a Reply

    You Missed

    अंधेरीत ड्रग्स माफियांकडून थरारक पाठलाग, ४ जणांना गाडीने उडवलं – दया नायक घटनास्थळी उपस्थित

    अंधेरीत ड्रग्स माफियांकडून थरारक पाठलाग, ४ जणांना गाडीने उडवलं – दया नायक घटनास्थळी उपस्थित

    ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

    ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने