सोशल मीडियासाठी जीव धोक्यात! अहमदनगरमध्ये रील शूट करताना तरुणाला बसली प्रत्यक्ष फाशी

अहमदनगर

डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणी काय करेल, हे सांगता येणं अशक्य झालंय. लाईक्स, फॉलोअर्स आणि कमेंट्सच्या हव्यासात अनेकजण धोकादायक स्टंट्स करताना दिसत आहेत. मात्र, अशाच एका स्टंटने अहमदनगरमध्ये एका तरुणाचा जीव धोक्यात आला आहे.

जामखेड शहरात रीलसाठी बनाव करताना एका युवकाला चक्क खरी फाशी बसली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला असला तरीही त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती आहे.

रीलसाठी ‘फाशी’चा स्टंट… आणि झालं भीषण वास्तव

ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडली. प्रकाश बुडा असं या तरुणाचं नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. सध्या तो जामखेडमधील एका हॉटेलमध्ये काम करत होता. प्रसिद्धीसाठी त्याने “फाशी घेण्याचा” बनाव करत स्वतःचं चित्रीकरण (रील) सुरू केलं.

मात्र रीलच्या नशेत आणि निष्काळजीपणामुळे दोरी गळ्याला अडकली आणि तो खऱ्या अर्थाने फासावर लटकला. तो बेशुद्ध झाला आणि घटनास्थळी खळबळ उडाली.

वेळीच मदत मिळाल्याने जीव वाचला

ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्या युवकाला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या तत्परतेमुळे प्रकाश बुडा याचा जीव सध्या तरी वाचलेला आहे, मात्र प्रकृती गंभीर आहे.

सोशल मीडियाच्या हव्यासाला लगाम!

या घटनेनंतर समाजात संतापाची आणि चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ करणं हे किती भयंकर परिणाम घडवू शकतं, हे या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आवाहन केलं आहे की,

“फक्त काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी तरुणांनी आपला जीव धोक्यात घालू नये. लाईक्स, फॉलोअर्स यांच्यापेक्षा आपला जीव आणि सुरक्षितता अधिक महत्वाची आहे.”

तरुणांसाठी इशारा

देशभरात सध्या अनेक ठिकाणी रील्ससाठी धोकादायक स्टंट्स, रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट्स, इमारतींवर चढून शूटिंग अशा प्रकारांची संख्या वाढताना दिसत आहे. प्रशासन आणि समाजाकडून वारंवार इशारा दिला जात असूनही काही तरुण याकडे दुर्लक्ष करत आहेत.

नगरमधील ही घटना डोळे उघडणारी असून, आता तरी प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा, सुजाणपणा आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करण्याचा विचार करायला हवा.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    तब्बल ₹४० कोटींच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज तस्करी आणि नेटवर्कशी संबंधित हाय-प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपीला न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब खान याचा जामीन…

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या त्या धक्कादायक घटनेचा आजही कोणाला विसर पडलेला नाही. नसरापूरच्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका