या बायका मिसरी लावतात अन् गावभर हिंडतात…! चिुमकल्याची तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार, पाहा VIDEO

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंचं नाव काढलं की सर्वांचेच धाबे चांगलेच दणाणतात. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपन्यांवर धडाधड धाडी टाकल्या आहेत. तुकाराम मुंढेच्या या कामगिरीमुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर अनेक जण स्वत:हून त्यांना त्यांच्या शहरात येऊन सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी करण्याची विनंती करत आहेत. FDA मार्फत तक्रारीसाठी टोल फ्रि नंबर्सही देण्यात आले आहेत.अशीच एक गंमतीशीर तक्रार तुकाराम मुंढेंपर्यंत आली आहे. एका लहानग्या चिमुकल्याने तुकाराम मुंढे यांना आपल्या गावात येण्याची विनंती केली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लहानग्या चिमुकल्याने तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार 

एका लहान मुलाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. त्याने मुंढेंना दात घासण्यासाठी जी मशेरी लावली जाते ती बंद करण्याची विनंती केली आहे. त्याने म्हणटलं आहे , “या गावातल्या बायका तोंडामध्ये मशेरी भरतात आणि गावभर लोकांची मापं काढत फिरत असतात.”अशी तक्रार त्याने केली आहे. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा अन्…

हा व्हिडीओ namdev.patil.5015 या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. यात हा चिमुकला मजेशीर अंदाजात म्हणताना दिसत आहे की, “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, या बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात,” या मजेशीर अंदाजात त्याने व्हिडिओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Namdev Patil (@namdev.patil.5015)

मशेरी किंवा मिसरी म्हणजे काय?

तंबाखू भाजून त्याची पावडर तयार केली जाते. नंतर या पावडरचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. या पावडरला ग्रामीण भाषेत मशेरी किंवा मिसरी असे गावकरी म्हणतात. वर्षानुवर्षे गावकरी काही लोक किंवा वृद्ध मंडळी टूथपेस्टऐवजी मशेरीने दात घासतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांनी दात घासणं हे आरोग्यासाठी योग्य नाही. याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

या अवघ्या 30 सेकंदांच्या व्हिडीओवर आतापर्यंत हजारोंच्या घरात प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे तातडीनं लक्ष द्याची गरज आहे.” तर कोणी म्हणतंय, “बाळा, उगाच नको ती तक्रार करू नकोस नाहीतर गावातील बायका लाटणं घेऊन तुझ्याच मागे लागतील.” एकंदरीत हा व्हिडीओ अगदीज सर्वाच्या पसंतीस पडला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं.…

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध…

    Leave a Reply

    You Missed

    अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता

    अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन आणि अचानक पूर; ४ मृत्यू, ५ सैनिक बेपत्ता

    या बायका मिसरी लावतात अन् गावभर हिंडतात…! चिुमकल्याची तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार, पाहा VIDEO

    या बायका मिसरी लावतात अन् गावभर हिंडतात…! चिुमकल्याची तुकाराम मुंढेंकडे मजेशीर तक्रार, पाहा VIDEO

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    १ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना  दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    नाशिककरांचे हाल! सिटी लिंक बससेवा कोलमडली; तब्बल २०० फेऱ्या रद्द, महापौरांनी स्पष्ट केलं कारण

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    कॅगचा धक्कादायक अहवाल! भारतीय रेल्वेला १०० कमवण्यासाठी ९८.२२ चा खर्च; प्रवासी सेवांमध्ये हजारो कोटींचा तोटा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा

    तुम्हीही फ्रिजमध्ये अन्न चुकीच्या पद्धतीने ठेवता का? ९०% लोक करतात ‘या’ ५ चुका; होऊ शकते विषबाधा