१ कोटी तरुणांना AI ची ट्रेनिंग ते स्पर्धा परीक्षांसाठी फ्रि ऑनलाइन कोचिंग! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 व्यांदा भारतीयांना संबोधित केलं. भारताचं राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ला 150 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून मोठा उत्साहात आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशाचे वर्क कल्चर बदलण्याची गरज असल्यची घोषणाही मोदींनी केली आहे.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह 

लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची सुरुवात सशस्त्र दले आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’म्हणजे मानवंदना देत केली. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीताची धून वाजली.

त्यानंतर २१ तोफांची सलामी देत भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्समधून पुष्प वर्षाव करण्यात आला. २,५०० एनसीसी कॅडेट्स आणि ‘माय भारत’च्या स्वयंसेवकांनी ‘ज्ञानपथा’वर ‘वंदे मातरम्’चा आकार साकारला.या कार्यक्रमासाठी १५,००० ते २०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे.

तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदींनी तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. शिक्षण आणि क्रिडा क्षेत्रात तरुणांसाठी भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध करणार असल्याची मोठी घोषणा मोदींनी केली आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यांच्या मते, देशाचा तरुण हा विकसित भारताच्या निर्मितीतील सर्वात मोठा साधक आणि लाभार्थी आहे. सरकारने स्टार्ट-अप इंडिया, स्किल इंडिया आणि नवीन शिक्षण धोरणांसारख्या अनेक योजनांद्वारे तरुणांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे.”

तसेच मोदींनी पुढे म्हटलं,”तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करण्यात आली आहे. एक कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडियासारखे कार्यक्रम राबवले जात आहेत, ज्यामुळे देशाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. तसेच, नशामुक्त भारत अभियानाद्वारे तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल.”

गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मोफत ऑनलाइन कोचिंगचे व्यापक नेटवर्क उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘खेलो इंडिया’मधून नव्या संधी

क्रीडा क्षेत्रातील तरुणांच्या वाढत्या सहभागावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. या उपक्रमामुळे देशभरातील तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी पुढे केली असून, २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीही देश सज्ज असल्याचे मोदी यांनी सांगितले.

५ ते १५ वयोगटातील मुलांमधून खेळाडू घडविणार

जागतिक स्तरावर सुमारे ४० प्रकारचे खेळ आणि जवळपास ३२५ विविध स्पर्धा प्रकार अस्तित्वात आहेत. मात्र, यापैकी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये भारताचा सहभाग अत्यल्प असून काही ठिकाणी भारतीय खेळाडूंना पात्रताही मिळत नसल्याची खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.

यावर मात करण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सक्षम खेळाडू घडवायचे असतील, तर आजपासूनच ५ ते १५ वयोगटातील मुलांमधील क्रीडा कौशल्य ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील, असे मोदी म्हणाले

देशाचा विकास करूनच दाखवू

तसेच पुढे म्हणाले, ‘देश 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मागील काही दिवसांपासून देशाच्या काही भागात पूरस्थिती होती. भूस्खलन झालं. अनेक कुटुंबाना फटका बसला. मी पीडित कुटुंबांना विश्वास देतो की, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. कोणताही देश जेव्हा महान होतो, तेव्हा स्वप्न, संकल्प, सामर्थ्याच्या बळावर पुढे जातो. छोटे स्वप्न नव्हे, तर मोठं स्वप्न, लक्ष्य ठेवल्यास विचार विकसित होतात. आपले संकल्प दृढ असले पाहिजे. आपले संकल्प देखील मोठे असले पाहिजे. त्यामुळे आपण प्रयत्न जास्त करतो. त्यामुळे स्वप्न साकार होण्यास मदत होते. आमचंही एक स्वप्न आहे. 2047 वर्ष येईल, त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा देशाचा विकास करूनच दाखवू. सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवतो. त्यावेळी त्याच्या साहसाची जोरदार चर्चा होते’, असे मोदी यांनी पुढे सांगितले.

पंतप्रधानांकडून सोशल मीडियावर शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे सहा वाजता ‘एक्स’च्या माध्यमातून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “सर्व देशबांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हा राष्ट्रीय सण आपल्याला देशाच्या शूर वीरांनी दाखवलेले असीम धैर्य, अथक संघर्ष आणि मातृभूमीप्रती असलेली अतुलनीय निष्ठा यांची आठवण करून देतो. चला, आपण त्यांचे आदर्श अंगीकारूया आणि विकसित भारताचा संकल्प साकार करूया.” अशा शुभकामना मोदींनी व्यक्त केल्या.

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच