डॉमिनोज पिझ्झानंतर तुकाराम मुंढेंचा फ्रुटी,कॅन्डी ज्यूस, अ‍ॅपे फिज वाल्यांना दणका; तब्बल 11 तास सुरु होती झडती

सध्या सगळीकडे चर्चा आहे ते फक्त तुकाराम मुंडे यांच्या दणक्याची. सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोर,अन्ना सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि नियम मोडणारी मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट विरुद्ध जोरदार कारवाई सुरु आहे.तुकाराम मुंढेंचा मोर्चा पुढे कुठे वळेल याचा काही नेम नाही.

मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या ‘पार्ले अ‍ॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड

मुंबईतील डॉमिनोज पिझ्झाच्या चार आउटलेट्सवर कारवाई करण्यात आली. तिथे व्हेज-नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म वापरला जात होता.त्यानंतर गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या ‘पार्ले अ‍ॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईत मुदत संपलेल्या एक्सपायरी डेट ओलांडून गेलेली फ्रुटी, अ‍ॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती.

एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू केलेलं हे धाडसत्र 14 ऑगस्टच्या पहाटे 5 वाजता थांबलं. तब्बल 11 तास झाडझडती सुरु होती. बुधवारी एफडीएकडून विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटसचे परवानेही निलंबित करण्यात आले. ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत हे आउटलेट्स सुरु होते.

FDAची मुदतबाह्य खाद्यपदार्थांविरोधात मोहीम

मुंबईत मुदत संपलेले अन्नपदार्थ साठवणे किंवा त्यांची विक्री होण्याची शक्यता निर्माण होणे, या प्रकारांविरोधात FDAने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या कारवाईकडे त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे अन्नपदार्थांची मुदत, साठवणूक, स्वच्छता आणि सुरक्षितता या बाबी ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे गोदामांपासून विक्री केंद्रांपर्यंत अन्नसाखळीतील नियमांचे पालन होते का, याची तपासणी महत्त्वाची ठरते.

महाराष्ट्रात खाद्य व्यवसायांवर कारवाई

FDAची ही कारवाई एका दिवसापुरती मर्यादित नसून राज्यातील खाद्य सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. 12 ऑगस्ट रोजी जुबिलेंट फूडवर्क्स लिमिटेडच्या चार डोमिनोज आउटलेट्सचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आल्याचे प्रहारच्या वृत्तात नमूद आहे. या तपासणीत FSSAI परवाना प्रदर्शित न करणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसणे, अन्न साठवणुकीतील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्याचे सांगण्यात आले.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच