गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल थांबणार कधी? २७२ स्पेशल गाड्यांनंतरही चाकरमानी वाऱ्यावर, १५ ऑगस्टला बेलापूर मुख्यालयावर धडक

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि विशेषतः तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात. मात्र,दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना रेल्वे तिकिटांच्या अतोनात तुटवड्याला आणि प्रवासातील हालांना सामोरे जावे लागत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव, मोजक्याच गाड्या आणि तळ कोकणाकडे होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष याविरोधात आता कोकणी प्रवासी संघटना प्रचंड आक्रमक झाली आहे.

तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत

नियमित गाड्यांसह तब्बल २७२ ‘गणपती स्पेशल’ गाड्या जाहीर करूनही चाकरमान्यांना तिकिटे मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे, अनेक गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच मर्यादित असल्याने सिंधुदुर्ग आणि तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. ज्या महाराष्ट्राने या प्रकल्पात २२% गुंतवणूक केली, त्या महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या तीनच गाड्या आल्याची तीव्र खंत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनस, वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी पॅसेंजर, दादर-चिपळूण मेमू सेवा आणि कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण यांसारख्या प्रमुख मागण्या अद्याप धूळ खात पडून आहेत.

कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’

या सर्व अनास्थेविरोधात आणि चाकरमान्यांच्या हक्कासाठी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता, बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर ‘लाक्षणिक उपोषण’ छेडण्यात येणार आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे आणि सचिव यशवंत जड्यार यांनी सर्व मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कोकणवासीयांना या उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच