आदित्य ठाकरेंकडून कर्जतच्या ‘चिमुकल्या रिपोर्टर्स’चं कौतुक; थेट फोनवरून संवाद अन् मुलींना दिली सायकलींची भेट

कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील विद्यार्थिनींनी छत्रीचा माईक करून जी रस्त्याची दुरवस्था समोर आणली होती.त्यानंतर काही तासातच हा रस्ता दुरुस्त झाला. त्यानंतर अनेक गावातून अनेक शाळकरी मुलांनी पुढे येऊन अगदी त्याचप्रमाणे गावातील रस्त्यांची व्यथा मांडली.त्यामुळे कर्जतच्या त्या विद्यार्थिनींचं सर्वांनीच कौतुक केलं. यात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही मागे नाही.त्यांनी देखील या मुलींचं भरभरून कौतुक केलं आहे.

आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थिनींच्या धाडसाचं कौतुक अन् सायकल गिफ्ट

कोंदिवडे गावात हातातील छत्रीचा माईक बनवत खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याचं केलेलं हे अनोखं रिपोर्टिंग सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर चांगलंच व्हायरल झालं. त्यांच्या या धाडसाची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या विद्यार्थिनींशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या धाडसाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर त्या मुलींना आदित्य ठाकरे यांच्याकडून सायकलही भेट देण्यात आली.

आदित्य ठाकरेंचा या विद्यार्थिनींशी फोनवरून संवाद

आता रस्ता दुरुस्त झाल्यानंतर या चिमुकल्या रिपोर्टर्सनं याच रस्त्यावर दुतर्फा वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी या तीनही विद्यार्थिनींची भेट घेतली. खांडपे येथील मानसी पवार यांच्या घरी तिन्ही विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांशी युवासेना पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी फोनवरून या मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच एवढ्या कमी वयात धाडसानं नागरिकांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलं.

रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर विद्यार्थिनींचे पर्यावरण संवर्धनासाठी पुढचं पाऊल

बरं, फक्त रस्त्याची समस्या मांडून या मुली थांबल्या नाहीत. तर, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोंदिवडे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे. यासाठी कृषी विभाग आणि वन विभागानं आवश्यक रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावल्यास कोंदिवडे परिसर अधिक हिरवागार होईल आणि पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल, अशी भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच