प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील आऊटलेट्स थेट बंद

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सध्या कारवाईचा धडका लावला आहे. दररोज FDA कडून धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक मोठमोठी हॉटेल्स, उपहारगृह आणि रेस्टॉरंट मालकांचे धाबे दणाणले आहेत. FDA ने थेट मुंबईतील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर धाड टाकत तीन आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. या तिनही आऊटलेटचे परवाने निलंबित केले आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेट थेट बंद 

विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहे डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटवर धाड टाकल्यानंतर तिथे तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं. ही कारवाई राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरु असलेल्या कारवाईचा भाग आहे. त्याशिवाय मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेटसचे परवाने निलंबित करण्यात आलेत. ज्यूबिलंट फूडवर्क्स अंतर्गत हे आउटलेट्स सुरु होते.

मुंबईतील डोमिनोजच्या आऊटलेमध्ये FDAच्या आदेशानुसार, या तीनही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २०११ मधील परिशिष्ट-४ मधील तरतुदींचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे संबंधित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

का बंद करण्यात आले हे तीन आऊटलेट?

विलेपार्ले आऊटलेटमध्ये स्वच्छता व साठवणुकीबाबत त्रुटी

विलेपार्ले पश्चिमेतील एस. व्ही. रोडवरील डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटच्या तपासणीत FSSAI Licenseचे प्रदर्शन, पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्न साठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधा याबाबत त्रुटी आढळल्या.फ्रोजन फूड तसेच इतर अन्नपदार्थ योग्य तापमानावर साठवणे आणि त्याचे नियमित तापमान निरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अन्न तयार करण्याचे क्षेत्रामध्ये स्वच्छता राखणे आणि Food व Non-Food वस्तूंचे योग्य विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच किचनमधील दरवाजा, फरशी आणि शीतकरण कक्ष(Chilling Room) मध्ये आवश्यक दुरुस्ती करून उंदरांचा आणि किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

बोरिवली आऊटलेटमध्ये 54 टक्के नियमपालन न करणे

बोरिवली पश्चिमेतील आय.सी. कॉलनी परिसरातील डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटच्या तपासणीत Schedule-4च्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आले असून एकूण 54 टक्के गुणांसह Non-Compliance म्हणजे नियमांचे उल्लंघन आढळून आलं.

अन्न साठवणूक, अन्न साठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधा यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कच्चे व बिगर-अन्न पदार्थ स्वतंत्रपणे ठेवणे तसेच कच्चे आणि शिजवलेले, शाकाहारी आणि मांसाहारी अन्न यांचे योग्य विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच उपकरणे व भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक करणे आणि Pizza व Food Preparation Area मधील तेलकटपणा व अन्नाचे अवशेष तातडीने साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

R-City Mallमधील आऊटलेटमध्ये नियमांचे उल्लंघन 

घाटकोपर पश्चिमेतील R-City Mall मधील डॉमिनोज पिझ्झाच्या आऊटलेटचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वच्छतेची योग्य व्यवस्था नसणे तसेच स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण वेळापत्रक उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले. तपासणीदरम्यान कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे तसेच प्रभावी कीटक नियंत्रण उपाययोजना आणि त्यासंबंधी नोंदी उपलब्ध नसल्याचे आदेशात नमूद आहे. अन्न साठवणुकीत FIFO/FEFO पद्धतीचे पालन आणि योग्य तापमान नियंत्रण नसल्याचेही निदर्शनास आले.तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले.

FDAच्या कारवाईमुळे मुंबईतील या तीन डॉमिनोजच्या आऊटलेटचा अन्न सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित त्रुटींची पूर्तता करून नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच