“RTI देणार नाही,काय करायचं ते कर!” इथेही घोटाळा? बाचेगावच्या ग्रामसेवकाची मुजोरी अन् तरुणाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल,

गावातील विकासकामे, ग्रामपंचायतीचा कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्न विचारणे हा प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार आहे. मात्र, माहिती मागणाऱ्या नागरिकांना योग्य उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देणे किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणे, असा प्रकार नांदेड जिल्ह्यातील बाचेगाव येथे समोर आला आहे. बाचेगावातील योगेश गुरुलवाड या तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर आणि आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पथदिव्यांचा वाद

योगेशने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामसेवकांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की, येत्या दिवाळीपूर्वी गावातील सर्व खांबांवर पथदिवे बसवले जातील. मात्र, तब्बल ७ महिने उलटून ऑगस्ट २०२६ उजाडला, तरीही गावातील अनेक खांबांवर अजूनही पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. अंधारात राहणाऱ्या ग्रामस्थांना रोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ग्रामसेवकाची मुजोरी

पथदिवे न बसवल्यामुळे आणि या कामात नेमका काय गोंधळ आहे हे जाणून घेण्यासाठी योगेशने माहिती अधिकारांतर्गत अर्जाद्वारे माहिती मागवली. मात्र, ग्रामसेवकांकडून ही माहिती देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात होती. योगेशने जेव्हा फोनवरून ग्रामसेवकाकडे RTI ची माहिती कधी मिळणार याबाबत विचारणा केली, तेव्हा “RTI देणार नाही, काय करायचं ते करून घे!” असे अत्यंत उद्धट आणि अरेरावीचे उत्तर ग्रामसेवकाने दिल्याचे योगेशने सांगितले.

तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार समोर

ग्रामसेवकाच्या या वागणुकीनंतर योगेशने हार न मानता ऑनलाईन पोर्टलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार नोंदवली. तक्रार ग्रामसेवकापर्यंत पोहोचताच दुसऱ्याच दिवशी योगेशला माहिती घेऊन जाण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र, तिथे गेल्यावर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. योगेशने पथदिव्यांच्या कामासंबंधी आणि त्यावरील खर्चासंबंधी नेमकी माहिती मागितली होती. ती अपेक्षित माहिती देण्याऐवजी ग्रामसेवकाने चक्क ग्रामपंचायतीच्या कॅशबुकच्या २० ते ३० पानांच्या झेरॉक्स प्रती त्याच्या हातात टेकवल्या.

आर्थिक व्यवहारात अनियमिततेची शंका अन् चौकशीची मागणी

या प्रकारानंतर योगेशने प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “मागितलेली मूळ माहिती न देता कॅशबुकच्या प्रती देण्यामागचा उद्देश काय? ग्रामसेवक नेमकी कोणती माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत?” अशा अनेक शंका त्याने उपस्थित केल्यात.

यावरून बाचेगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला आहे का, अशी तीव्र संशयही व्यक्त केला जात आहे. योगेशने या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

१५ ऑगस्ट २०२६ चे नवे आश्वासन पूर्ण होणार का?

दरम्यान, ग्रामसेवकाने येत्या १५ ऑगस्टपर्यंत गावात पथदिवे बसवून दिले जातील, असे नवे आश्वासन देण्यात आल्याचंही योगेशनं सांगितलं. परंतु, मागील अनुभवावरून ग्रामस्थ या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा, याच संभ्रमात आहेत. आता १५ ऑगस्टला बाचेगावातील अंधार दूर होऊन पथदिव्यांचा प्रश्न खरोखर मार्गी लागतो की हे आश्वासनही कागदावरच राहते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच