घाटकोपर दरड दुर्घटना अपडेट! ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह बाहेर; मृतांचा आकडा वाढला, बचावकार्य सुरुच

मुंबईतील घाटकोपरच्या अशोकनगर परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी साकीनाका गौसिया चाळ परिसरात डोंगराचा काही भाग अचानक कोसळला. ही दरड दोन ते तीन घरांवर कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, मुंबई पोलीस आणि महापालिकेची पथकं तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं.

अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती 

दरम्यान पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची माहितीही समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग अचानक कोसळल्याने घरांवर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बुधवारी १२ ऑगस्टच्या दुपारपर्यंत एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध गेला.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डोंगर उतार आणि धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातील माती व दगड दोन-तीन घरांवर 

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यातील माती व दगड दोन-तीन घरांवर पडले. यामुळे काही व्यक्ती घरात अडकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार पाच ते सहा जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्या खाली अडकलेल्या  ५ ते ६ व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे.  मोहम्मद समीर अन्सारी, साहिल हुसेन अब्दुल काझी, अबान आरिफ शेख, मनत आरिफ शेख, मर्जिना आरिफ शेख यांना मृत घोषित केले आहे. तर चौघांवर उपचार सुरु आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच