ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ अडचणीत आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना जवळपास 16 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल.आधी संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि त्यानंतर गोलंदाजीही अयशस्वी ठरली. खेळाचे दोन दिवस उलटून गेले असून, सध्या बांगलादेश आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

पहिल्या डावात बांगलादेशने 153 धावांची आघाडी घेतली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात बांगलादेशने 153 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 198 धावांवर रोखलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 गडी बाद 351 धावा केल्या. तसेच 153 धावांची आघाडी घेतली. यात तन्झिद हसन तमीमची शतकी खेळी महत्त्वाची ठरली.

सामन्याचा हिरो ठरला तन्झिद हसन

मात्र या सामन्याचा हिरो ठरला तन्झिद हसन.त्याने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसऱ्याच कसोटी सामन्यात तन्झिदने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली. तन्झिद हसन तमीमने 197 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 101 धावा केल्या आणि बाद झाला. तन्झिदचे शतक ऐतिहासिक ठरलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांग्लादेशी फलंदाजाने दुसरे शतक आहे. यापूर्वीचे शतक 2006 मध्ये फतुल्ला येथे शहरियार नफीसने केलेल्या 138 धावांची खेळी केली होती. बांगलादेशचा सलामीवीर तन्झिद हसन तमीमने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी शतक झळकावले आहे.

चार वर्षांनी विदेशी भूमीवर बांग्लादेशी फलंदाजाने केलेले हे कसोटी शतक होतं.

विशेष म्हणजे,ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी शतक झळकावणारा तो पहिला बांगलादेशी फलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही बांगलादेशी खेळाडूला ऑस्ट्रेलियात यापूर्वी करता आलेली नाही. तन्झिदने हा विक्रम त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यात केला आहे. 2022 मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महमूदुल हसन जॉयने शतक ठोकलं होतं. चार वर्षांनी विदेशी भूमीवर बांग्लादेशी फलंदाजाने केलेले हे कसोटी शतक होतं.

ऑस्ट्रेलियासमोर सर्वात मोठं आव्हान

आता पुढील डावात ऑस्ट्रेलियासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे बांगलादेशची आघाडी कमी करणे आणि सामन्यात पुनरागमन करणे. बांगलादेशने ही आघाडी आणखी वाढवली तर ऑस्ट्रेलियासाठी सामना वाचवणंही मोठं आव्हान ठरू शकतं. ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर बांगलादेश इतिहास रचणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जपानमधील निशिन येथील कोरोगी क्रीडा संकुलात खेळल्या…

    विनोद कांबळींचा वृद्धाश्रमातील व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर! वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी सांगितलं कारण, म्हणाले “आता त्याची पत्नी….”

    भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा वृद्धाश्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विनोद कांबळी या व्हिडिओमध्ये वृद्धाश्रमाबद्दल बोलताना दिसत आहे. कांबळीला अशा अवस्थेत पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    राञी चोरी करायला गेले अन्… मुंबईतील मनोरी किनाऱ्यावर चार महिन्यांपासून अडकलेल्या जहाजावर भयंकर घडलं; थेट जहाजातून मृतदेह बाहेर

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    पेट्रोल पंपावर मित्रांना सोडायला गेला अन् काळानं घात केला! बोरगाव काळेजवळ अपघातात तरुणाचा दुर्दैवी अंत, अवघ्या ४ महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर

    जबाबदारी प्रशासनाची अन् खर्च मुंबईकरांच्या खिशातून? अंधेरी उड्डाणपूल दुरुस्तीचा खर्च थेट १३० कोटींवर; अतिरिक्त भार मुंबईकरांच्याच खांद्यावर