आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या महाअंतिम सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जपानमधील निशिन येथील कोरोगी क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या थरारक सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. भारतीय क्रिकेट संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या टी-२० प्रकारात सुवर्णपदकही जिंकले आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. शेवटच्या षटकापर्यंत सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघाने पराक्रम केला.
भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी केवळ दोन षटकांत २८ धावा
भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी केवळ दोन षटकांत २८ धावा करून वेगवान सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात वैभव बाद झाला, तर संजू सॅमसनही फार काळ टिकू शकला नाही. अभिषेक शर्माने मात्र आपली स्फोटक फलंदाजी सुरूच ठेवत केवळ २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने केवळ २८ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. पण त्यानंतर ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर फार काही करू शकले नाहीत. अखेरीस, तिलक वर्माच्या २२ चेंडूंतील ५१ धावा आणि शिवम दुबेच्या १५ चेंडूंतील २७ धावांनी संघाला २११ धावांपर्यंत पोहोचवले.
पाकिस्तानची सुरुवातही खराब
दुसरीकडे, पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली आणि त्यांनी अवघ्या ३९ धावांत तीन गडी गमावले. अक्षर पटेलने दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक आऊट घेतला. पण त्यानंतर हसन नवाझने भारतीय गोलंदाजांवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत हल्ला चढवला. मात्र, आपल्या डावाच्या सुरुवातीलाच, ४ धावांवर असताना वैभव सूर्यवंशीने एक झेल सोडला.
जसप्रीत बुमराहने एकही विकेट काढली नाही, याची खंत
पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत बाजी लढवत होता पण जिंकणं काही शक्य झाले नाही. भारतीय संघाकडून फक्त तिलक आणि अभिषेकच्या जोडीला कमाल करता आली. तिलक आणि अभिषेकच्या अर्धशतकी खेळीच्या जीवावर भारतीय संघाने इतक्या धावा केल्या नाही तर २११ चा डोंगरव उभारला गेला नसता, तर कदाचित भारतीय संघाला विजय मिळवताना बऱ्यात अडचणींचा सामना करावा लागला असता. अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट काढल्या. चाहत्यांना एक खंत असेल की जसप्रीत बुमराहने एकही विकेट काढली नाही. बुमराहला आज बराच संघर्ष करावा लागला आणि यश काही मिळालेच नाहीय.
तर टिळक वर्माने ५१ धावांचे योगदान दिले
भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी जपानमधील निशिन येथील कोमकी मैदानावर झालेल्या या थरारक सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २११/६ असा विशाल धावसंख्या उभारली होती. भारताकडून अभिषेक शर्माने २८ चेंडूत ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर टिळक वर्माने ५१ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत १९२/६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानच्या हसन नवाजने ९६ धावांची झुंजार खेळी केली, मात्र भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत पाकिस्तानला रोखले आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवून आपले सुवर्णपदक कायम राखले.










