भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा वृद्धाश्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विनोद कांबळी या व्हिडिओमध्ये वृद्धाश्रमाबद्दल बोलताना दिसत आहे. कांबळीला अशा अवस्थेत पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कांबळी स्वतः वृद्धाश्रमातील सुविधा आणि प्रसन्न वातावरणाचं कौतुक करताना दिसत आहे. पण विनोद कांबळी सारख्या एवढ्या मोठ्या क्रिकेटरवर अशी वृद्धाश्रमात राहण्याची वेळ का आली असावी? याचा प्रश्न माञ सर्वांनाच पडला आहे. त्यामगचं नेमकं सत्य काय आहे?
वृद्धाश्रमाचा आधार का घ्यावा लागला?
विनोद कांबळी ‘निदान द मुक्ती’ या वृद्धाश्रमात आहे. कांबळी मागील काही काळापासून शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना नीट चालता न येणे, युरिनरी इन्फेक्शन, आणि मेंदूशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला आहे. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर नियमित काम किंवा उत्पन्नाचे मोठे साधन न राहिल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे वैद्यकीय व दैनंदिन खर्च उचलणे कठीण झाले होत होतं त्यामुळे त्याला या वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला आहे.
त्याच्यात साधं उभं राहण्याइतकीही ताकद नव्हती
या वृद्धाश्रमात कांबळीवर अनेक दिवसांपासून ट्रीटमेंट सुरू होती आणि विशेष म्हणजे तिथे राहण्याबाबत त्याच्याकडून कोणतेही शुल्क आकारलं नसल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल त्या वृद्धाश्रमाच्या संस्थापकांनी स्वत: माहिती दिली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या NGOचे संस्थापक महेश नाईक यांनी सांगितलं की, कांबळी त्यांच्यासाठी ‘हिरो’ आहे आणि त्याला हवं तितके दिवस पूर्णपणे मोफत तिथे राहता येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाईक म्हणाले, “विनोद कांबळी गेल्या वर्षी आमच्या संस्थेत दाखल झाला होता आणि जवळपास पाच ते सहा महिने आमच्यासोबत राहिला. आम्ही त्याला फिजिओथेरपी आणि इतर आवश्यक उपचार दिले. तो जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे आला, तेव्हा त्याच्यात साधं उभं राहण्याइतकीही ताकद नव्हती. मात्र, उपचारांना त्याने खूप चांगला प्रतिसाद दिला.”
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl
— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
पत्नी त्याला घरी घेऊन गेली आहे
तसेच ते पुढे म्हणाले,”यावेळी विनोद कांबळी आमच्याकडे आला तेव्हाही आम्ही त्याला आवश्यक फिजिओथेरपी दिली. त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे त्याच्यावर उपचार करताना आम्हाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. आता त्याची पत्नी त्याला घरी घेऊन गेली आहे.” असंही त्यांनी सांगितलं आहे.
विनोद कांबळी नेमकं झालंय तरी काय?
नाईक यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा तो आमच्यासोबत असतो, तेव्हा तो नेहमी आनंदी आणि उत्साही असतो. खरं तर, ज्या आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांनीच त्याला आमच्याकडे पाठवलं होतं. विनोद कांबळी आमच्यासाठी हिरो आहे. त्याला आयुष्यभरात जेव्हा कधी आमच्याकडे राहावंसं वाटेल, तेव्हा तो हवं तितके दिवस इथे राहू शकतो, तेही पूर्णपणे मोफत. त्याच्या उपचारांचा खर्चही आम्हीच उचलू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमच्या हिरोप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय, याचा आम्हाला आनंद आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे.








