प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य,हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; कसं असणार रेल्वेचं वेळापत्रक?

रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गासह हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेनं 15 आणि 16 ऑगस्टच्या मध्यरात्री बोरीवली–भाईंदर दरम्यान नियोजित केलेला जंबो ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसणार आहे. पश्चिम रेल्वेकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर कुठे असणार मेगाब्लॉक 

मध्य रेल्वेच्या ठाणे–कल्याण मार्गावर ब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटीहून सकाळी 9.34 ते दुपारी 2.17 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन फास्ट आणि सेमी-फास्ट लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली येथे अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या साधारण 10 मिनिटांनी उशिरा धावतील.

कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 2.58 दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी-फास्ट लोकलही कल्याण ते ठाणेदरम्यान स्लो मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्यांना ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा इथं अतिरिक्त थांबे असतील. मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावर कुठे असणार मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर पनवेल–वाशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटीहून बेलापूर, पनवेलच्या दिशेने सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल किंवा बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 दरम्यानच्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र पोर्ट मार्गावर परिणाम होणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकच्या काळात सीएसएमटी–वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक १६.०८.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर लाईनवर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ (पोर्ट लाइन वगळून) वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्रवाश्यांना… pic.twitter.com/iCnW8GbISs

— Central Railway (@Central_Railway) August 15, 2026

ट्रान्स-हार्बरवरही काही लोकल रद्द

ट्रान्स-हार्बरवरही काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान सुटणाऱ्या लोकल, तसेच पनवेलहून ठाण्याकडे सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 दरम्यान सुटणाऱ्या काही लोकल रद्द राहतील. मात्र ठाणे–वाशी,नेरूळदरम्यान सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांनी विशेषतः ठाणे–कल्याण, पनवेल–वाशी आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा असं रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वे प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने बोरीवली–भाईंदरदरम्यान 15 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.30 ते 16 ऑगस्टला पहाटे 4.30 या वेळेत नियोजित केलेला 4 तासांचा जंबो ब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे हा ब्लॉक आता होणार नाही. तसेच 16 ऑगस्टला पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच