सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस; भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस नसला, तरी शेतीकामांसाठी अत्यंत पूरक आणि समाधानकारक असा पाऊस पडत आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला असून वातावरण उत्साहवर्धक आहे. मात्र, याच दरम्यान भुईबावडा घाट क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. खारेपाटण-तिथवली-भुईबावडा-गगनबावडा या राज्य महामार्ग १७१ वर किलोमीटर ३१.१५० दरम्यान अचानक मोठी दरड कोसळली असून, महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प; जेसीबी घटनास्थळी रवाना

दरड कोसळून मोठा माती व दगडांचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर आल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. रस्ता लवकरात लवकर मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जेसीबी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल होत आहे. ढिगारा हटवून मार्ग सुरक्षित करण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.

जिल्ह्यात सरासरी ३१.३७ मिमी पावसाची नोंद

एकीकडे वाहतुकीचा खोळंबा झाला असला, तरी दुसरीकडे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३१.३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी किती ते पाहुयात

देवगडमध्ये ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कणकवलीमध्ये ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वैभववाडीमध्ये ३७ मिमी पावसाची नोंद तर ,कुडाळमध्ये ३६ मिमी पाऊस झाला. सावंतवाडी ३१ मिमी आऊस झाला तर, दोडामार्ग येथे २९ मिमी पाऊस झाला आहे. वेंगुर्ला ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, मालवणमध्ये ०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रशासनाचे वाहनधारकांना आवाहन

भुईबावडा घाट मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी. रस्ता पूर्णपणे साफ होऊन सुरक्षित घोषित होईपर्यंत या मार्गाचा वापर टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच