स्थानिक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि गरजूंपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचाव्यात या सामाजिक उद्देशाने ‘धुमाळ टीम’ आणि ‘स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर स्वर्गीय श्री. नारायण बाबूराव धुमाळ (माजी सीनियर सेल्स मॅनेजर, स्टार हेल्थ इन्शुरन्स) यांच्या स्मृतीस समर्पित आहे.
या उपक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मालाड पश्चिम विभागाचे युवा अधिकारी आदित्य सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
शिबिराची वेळ आणि ठिकाण
शिबिर रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असणार आहे. साहू आय हॉस्पिटल, कुमार व्हिला, सुतारवाडी, मढ आयलंड, मालाड पश्चिम ( मुंबई ४०००६१) येथे हे शिबिर पार पडणार आहे.
दरम्यान शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तसेच मोफत चाचण्याही करता येणार आहे. या शिबिरात अॅटलांटिस हॉस्पिटल आणि साहू आय हॉस्पिटल येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार असून त्यांना सल्ला देणार आहेत. या शिबिरामार्फत कोण-कोणत्या चाचण्या किंवा तपसणी करण्यात येणार आहे हे जाणून घेऊयात.
शिबिरात कोणती तपासणी होणार?
मोफत रक्त व शारीरिक चाचण्या
रक्त तपासणी: CBC, TSH, RBS आणि रक्तदाब (BP) तपासणी.
हृदय तपासणी: मोफत ECG चाचणी.
दरम्यान शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना इतर स्कॅनिंगसाठी २०% विशेष सवलत दिली जाईल.
जनरल फिजिशियन अटलांटिस हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पांडे , डॉ. सागर नाळे आणि डॉ. सुमेध केसरिया MD Medicine हे उपस्थित राहणार आहेत.
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (Gynaecologist)
अटलांटिस हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र डॉ. सोनम यांच्यामार्फत स्त्रीरोग तपासणी, गर्भधारणा मार्गदर्शन आणि बंध्यत्व तपासणी करण्यात येणार आहे.
मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप
डॉ. चिन्मया साहु हे साहू आय हॉस्पिटलचे नेत्ररोग तज्ज्ञ आणि रेटिना तज्ज्ञ आणि त्यांची तज्ज्ञ टीम दृष्टी तपासणी, रेटिना तपासणी व डोळ्यांचे आजार याबाबत तपासणी करणार आहेत. एवढंच नाही तर, शिबिरादरम्यान तपासणीमध्ये गरजू आढळणाऱ्या व्यक्तींना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.
या शिबिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना पहिल्या भेटीनंतर मोफत फॉलो-अपची सुविधाही दिली जाणार आहे.
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध
“आपले आरोग्य, आमची जबाबदारी, एकत्रितपणे निरोगी उद्याकरिता” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मढ, मालाड व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन धुमाळ टीमच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. 91 9321564521 किंवा 91 9819463731 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.








