महाराष्ट्रात सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित; सर्पदंश नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल ,सर्पदंशाच्या रुग्णांची डिजिटल नोंद होणार

महाराष्ट्रात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्पदंशाला आता ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित रुग्णाची तसेच सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे करणे शासकीय आणि खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच डॉक्टरांसाठी बंधनकारक असणार आहे.

सर्पदंशाच्या घटनांची नोंद ठेवून, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाचा निर्णय

सर्प विषबाधा किंवा सर्पदंश ही संभाव्यतः जीवघेणी स्थिती आहे. वेळेत निदान, योग्य प्रथमोपचार, तातडीने रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकतेनुसार सर्पविष प्रतिबंधक लस (एएसव्ही) देणे महत्त्वाचे ठरते. सर्पदंशाचा धोका विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात अधिक असतो. या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटनांची शास्त्रशुद्ध नोंद ठेवून त्याआधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सर्पदंशाच्या घटनांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यातून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याबरोबरच सर्पविष प्रतिबंधक लस म्हणजेच एएसव्हीच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने तातडीने उपचार मिळणे महत्त्वाचे आहे.

सर्पदंशाच्या रुग्णांची डिजिटल नोंद होणार

नवीन नियमांनुसार, सर्पदंशाचा रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर संबंधित आरोग्य संस्थेला त्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे द्यावी लागणार आहे. रुग्णाची माहिती डिजिटल पद्धतीने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली किंवा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदवली जाणार आहे. यामध्ये रुग्णाला देण्यात आलेल्या एएसव्हीच्या कुप्यांची संख्या, उपचाराचा परिणाम आणि आवश्यक असल्यास रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठविल्याची माहितीही समाविष्ट केली जाणार आहे.

तसेच रुग्णाच्या नोंदीमध्ये दंशाची तारीख व ठिकाण, वय, लिंग, दंशाची परिस्थिती, विषबाधेची लक्षणे, करण्यात आलेले उपचार, संदर्भ सेवा, उपचाराचा परिणाम आणि मृत्यू झाल्यास त्याची माहिती नोंदवावी लागणार आहे.

सर्पदंश नियंत्रणासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सर्पदंश नियंत्रणासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर संचालक, जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी यावर देखरेख करतील.

याशिवाय रुग्णालयांना एएसव्हीच्या साठ्याची, वापराची आणि शिल्लक कुप्यांची नियमित माहिती ठेवावी लागणार आहे. ज्या भागांमध्ये सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे, तेथे लसीचा तुटवडा होऊ नये यासाठी उपलब्ध आकडेवारीच्या आधारे पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.

सर्पदंशाच्या घटना, मृत्यू, हंगाम आणि घटनास्थळाचा अभ्यास करून स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत. वेळेत उपचार मिळणे हा सर्पदंशाच्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय असल्याने प्रत्येक घटनेची नोंद करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हे आजार देखील अधिसूचित म्हणून घोषित आहेत

करोना, सेरेब्रोस्पायनल फीव्हर , मेंदूज्वर, कांजण्या, क्षयरोग, विषमज्‍वर/ टायफॉइड, इन्फ्लूएंझा / इन्फ्लुएंझल न्यूमोनिया, कुष्ठरोग, गोवर, प्लेग, पोलिओ, रेबीज

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू