महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी अपडेट; SIR नंतरच होणार मतदान? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिक आणि राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे वेळापत्रक पुन्हा लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून. राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका चालू वर्षाऐवजी आता 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला होणार असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट

राज्यात मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. या निवडणुका यंदाच्या डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी 2027 पूर्वी होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. त्यातच राज्यातील 105 नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत घेण्याचा पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर येऊ शकतो.

SIR पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका नाही…सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्रक्रियेअंतर्गत अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होण्याची माहिती

सध्या राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची म्हणजेच SIR प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होण्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना राज्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.या संपूर्ण प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता प्रत्यक्ष मतदान डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये पार पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुदत संपलेल्या या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम पाहत आहेत. आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अंतिम तारीख नक्की काय असेल, हे सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या आगामी सुनावणी आणि न्यायालयाच्या अंतिम निर्णयावरच पूर्णपणे अवलंबून असणार आहे

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच