“बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करू शकत नाहीत”, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात दावा; शिवसेना पक्ष-चिन्हावरील पुढील सुनावणी 19 ऑगस्टला

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? शिंदेंची की ठाकरेंचं याबाबत सुनावणी पार पडली. आज १८ ऑगस्ट २०२६ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.आमदार अपात्रतेच्या मुद्यावर सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी परिच्छेद 10/1 ब नुसार आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.

“आमदार म्हणजे पक्ष नाही….”

सिब्बल यांनी म्हटले की, आमदार पक्षाचे असतात पण ते पक्ष नसतात. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. परिच्छेद 10/1 ब मध्ये राजकीय पक्षाचा सदस्य आणि विधीमंडळ पक्षाचा सदस्य यांच्यात फरक करण्यात आलेला आहे. पण सध्या विधीमंडळ पक्षाचे सदस्यच राजकीय पक्ष बनले आहेत. ते दहाव्या अनुसूचीला अमान्य आहे. विधानसभा अध्यक्षांनी निष्कर्षातून ही परिस्थिती मान्य केली आहे असं म्हणत सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे हे २०१८ च्या घटनेनुसार,नेते,आमदार आणि मंत्री झाले. आमदार म्हणजे पक्ष नाही. घटनेला विरोध केल्याने शिंदे यांच्यासोबत गेलेले ३९ आमदार अपात्र ठरतात” असं म्हणत सिब्बल यांनी न्यायालयासमोर 10 व्या अनुसूचीचा दाखला दिला.

सिब्बल विधानसभा अध्यक्षांबाबत काय म्हणाले?

दरम्यान आमदार अपात्रतेसोबतच सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांनी कसा चुकीचा निर्णय घेतला हे देखील न्यायालयासमोर मांडलं. “विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय अधिकाराबाहेरचे आहेत. अध्यक्षांना पक्षाच्या घटनेत लक्ष घालण्याचा अधिकार कसा?” असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

“अध्यक्षांनी निर्णय देताना फुटीआधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही?…”

ते म्हणाले की, “1999 ची घटना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. अध्यक्षांनी निर्णय देताना फुटीआधीचं पक्षाचं संविधान का वापरलं नाही? जेव्हा पक्षात फूट पडते आणि दोन्ही गट 2018 च्या संविधानाचा दाखला देत होते त्यावेळी पक्षाचं आधीचं संविधान वापरायला पाहिजे होतं. प्रतोद आमच्या बाजूनं होता. व्हीप आम्ही जारी केला होता. त्यामुळे बंडखोर आमदार अध्यक्षांची निवड करु शकत नाहीत कारण त्यांनी व्हीपविरोधात मतदान केलं” असंही सिब्बल यांनी म्हटलं.

बुधवारी १९ ऑगस्टला सिब्बलांचा युक्तीवाद संपणार?

आज शिवसेना कुणाची? या प्रकरणातील आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली असून आता या प्रकरणातील पुढील सुनावणी उद्या म्हणजे बुधवारी १९ ऑगस्टला होणार आहे. बुधवारी पुन्हा एकदा सिब्बल बाजू मांडणार आहेत. सिब्बल हे बुधवारी त्यांचा युक्तिवाद संपवणार आहेत. त्यानंतर शिंदेंच्या वकिलांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सुनावणीत सिब्बल कोणते मुद्दे उपस्थित करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच