पुण्यात आज १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय आहे?

पुणेकरांसाठी किंवा पुण्याला प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात आज मंगळवार, 18 ऑगस्टपासून 31 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जमावबंदी लागू केल्याचे पोलिसांनी सांगितल आहे.

पुणे पोलिसांनी मोठा निर्णय, कारण काय?

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील 14 दिवसांसाठी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी असणार आहे. पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37(1), (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरात 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, मोर्चे, रॅली, आंदोलने अथवा मिरवणुका काढण्यास पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे. विनापरवानगी गर्दी केल्यास किंवा या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कलम 135 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

आदेशातील प्रमुख नियम व निर्बंध काय असणार आहे ?

शस्त्रे व ज्वलनशील पदार्थांवर बंदी: सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, स्फोटक अथवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास सक्त मनाई आहे.

आक्षेपार्ह कृतींवर बंदी: पुतळे जाळणे, चिथावणीखोर घोषणाबाजी करणे किंवा सामाजिक शांतता बिघडवणारे कृत्य करण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

सोशल मीडियावर लक्ष: भडकाऊ भाषणे, अफवा पसरावेणारे संदेश किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

अपवाद: कर्तव्यावर असणारे पोलीस, शासकीय कर्मचारी आणि 3.5 फुटांपर्यंतची काठी बाळगणारे सुरक्षारक्षक यांना यातून सूट देण्यात आली आहे.

आगामी काळात येणारी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि ईद-ए-मिलाद यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखणे आवश्यक आहे. यावेळी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषण यांसारखी आंदोलने आयोजित केली जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

राहुल गांधींना कार्यक्रमासाठी परवानगी मिळणार का?

दरम्यान, राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा कार्यक्रम 22 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे . मात्र, त्यापूर्वीच जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांकडून परवानगी मिळणार की नाही? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच