नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे! महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरात जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. मात्र मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने होणार्‍या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण

सकाळच्या सुमारास अनेक जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांत नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे जाणवल्याचे समोर आलं आहे. मागील महिनभरात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वारंवार होणार्‍या भूकंपामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भीतीचं वातावरण आहे.

सोमावरीही भूकंपाचे 2 धक्के, पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टरचा धक्का बसला

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात धक्क्यांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन

मागील महिनाभरात नाशिक जिल्ह्यात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. वारंवार जाणवणाऱ्या या हादऱ्यांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. सकाळच्या वेळी अचानक धक्के जाणवल्याने काही नागरिकांची धावपळही झाली. वारंवार होणाऱ्या भूकंपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्ह्यात वारंवार धक्क्यांचे कारण शोधण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय पथकही नाशिकमध्ये आले होते. त्याने पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि मालेगाव या भागामध्ये भूकंपाच्या अद्ययावत आणि अचूक नोंदीसाठीचे आधुनिक यंत्रही बसवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मुंबईतल्या दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पारंपरिक ‘दसरा मेळावा’ पार पडणार आहे. १९६६ सालापासून चालत आलेली ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे.…

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अभिनेता अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका मिळाला आहे. अजय देवगणच्या बंगल्यातील थेट बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत अंतर्गत सजावट बुलडोझरने…

    Leave a Reply

    You Missed

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    मैदानात गाड्यांना परवानगी नाही,बॅनरवर बंदी!  दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासाठी महापालिकेकडून चक्क 24 अटी

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    अजय देवगण याला बीएमसीकडून मोठा दणका; जुहू येथील बंगल्यातील बांधकामावर थेट बुलडोझर

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    MPSC ला अखेर नवा प्रभारी अध्यक्ष मिळाला! विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तर १ महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या सतीश वाघोलेंकडे सूत्र

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    फडणवीस सरकारचा कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय! ५ जुन्या कोळीवाड्यांचे वाढीव क्षेत्र अन् ३ नव्या गावठाणांचे सीमांकन करण्याचा निर्णय

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक, क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    “साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” आमदार असलम शेख आक्रमक,  क्राईम ब्रांचच्या जॉइंट सीपींची भेट घेऊन विचारला थेट जाब

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    मेरठच्या प्रसिद्ध ‘निळ्या ड्रम’ हत्याकांडात ऐतिहासिक निकाल! पतीची क्रूर हत्या करणाऱ्या मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    ‘कॉकरोच जनता पार्टी’नंतर आता ‘मख्खी जनता पार्टी’ची एन्ट्री! CJP ला देणार टक्कर? ७२ तासांत ४० लाखांहून अधिक व्ह्यूज अन् लाखो फॉलोअर्स

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    बिल्डरांची मनमानी अन् नागरिकांची फसवणूक थांबणार, अनधिकृत इमारतींबाबत मोठा निर्णय; ‘या’ नियमाशिवाय फ्लॅट विकता येणार नाही

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच

    ओला-उबरसारखी ॲम्ब्युलन्सही आता होणार बुक! रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, खास अॅप लॉंच