महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटी ७ लाख मतदार वगळले; ३५ लाख मृत तर ७५ लाख गैरहजर

राज्यात राबवण्यात आलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेत तब्बल 2 कोटी 7 लाख मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. यामध्ये समोर आलेली माहिती नक्कीच धक्कादायक आहे. एसआयआर मोहिमेत 35 लाख मतदार मृत आढळून आले. तपासणीवेळी 75 लाख 22 हजार मतदार गैरहजर, तर 76 लाख 80 हजार स्थलांतरीत झाल्याचे दिसून आले. 18 लाख मतदारांची दुबार म्हणून नोंद झाली. इतर 2 लाख 23 हजार मतदार विविध कारणास्तव वगळले गेल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांना अर्ज ६ भरावा लागेल

प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची प्रत सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे . त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांना अर्ज ६ भरावा लागेल. मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पुढील निर्णय घेतील असंही आयोगाने कळवले आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये चालु असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरुन घेण्याचा कार्यक्रम दिनांक ३० जून २०२६ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबवण्यात आला होता. या कालावधीत राज्यातील एकूण ९.७८ कोटी इतक्या मतदारांपैकी ७.७१ कोटी मतदारांना त्यांचे गणना प्राप्त झाले. २.०७ कोटी इतके मतदार नियमानुसार किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास अपात्र असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना Uncollectable EF या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

या कारणांमुळे गणनापत्र प्राप्त झाली नाही

आढळून न आलेले किंवा गैरहजर असलेल्या मतदारांची संख्या आहे 75.52 लाख

कायमस्वरुपी स्थलांतरित असलेले आहेत 76.80 लाख

तर, मृत आहेत ३४.८१ लाख

दुबार मतदार आहेत १७.६३ लाख आणि इतर २.२३ लाख मतदार

प्रारुप मतदार याद्या २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारुप मतदार याद्या लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार याद्या २४ ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाना सॉफ्ट व हार्ड कॉपीच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येतील. ज्यांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये नियमानुसार समाविष्ट करता आली नाहीत अशा Uncollected EF गटातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित शासकीय कार्यालयांच्या सुचना फलकावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

अंतिम मतदार यादी कधी?

प्रारुप मतदार याद्य प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एका महिन्याच्या कालावधीत सदर प्रारुप यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करता येतील. प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले मतदार किंवा दि. १ सप्टेंबर २०२६ या अर्हता दिनांकापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण केलेले नव मतदार यांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडून सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाणार आहे. तसेच प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले मतदार किंवा १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकापूर्वी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेले नव मतदार यांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यानंतर मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.

फेरतपासणी होणार?

राज्यात मतदार यांद्याच्या विशेष सखोल फेरतपासणी एसआयआर मोहिमेतून तब्बल २ कोटी ०७ लाख मतदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३६ लाख मतदार मुंबईत तर ठाणे जिल्हयातून २८लाख मतदारांचा समावेश आहे. गणना प्रपत्र जमा न केल्याने ही नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. पुढील सोमवारी (२४ ऑगस्ट) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर महिनाभरात या मतदारांना पुन्हा अपिल करण्याची संधी मिळणार आहे.

एसआयआर मोहिम

राज्यात १ जुलै ते १७ ऑगस्ट दरम्यान एसआयआर मोहिम राबवण्यात आली. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ५० हजार मतदारांकडून स्वाक्षरीसह प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून सुमारे २ कोटी ७० लाख टक्के मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेली नाहीत. प्रपत्र जमा झालेले नाही त्यामध्ये ७५ लाख ५२ हजार मतदार त्यांच्या मतदार यादीतील पत्यावर आढळून आलेले नाहीत. ७६ लाख ८० हजार मतदारांनी कायमस्वरुपी स्थलांतर केल्याचे आढळून आले असून ३४ लाख ८१ हजार मृत मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आली. अन्यत्र नोंदणी किंवा दुबार मतदारांची संख्या १७ लाख ६३ हजार आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर, रायगड या जिल्हयांत गणना प्रपत्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे.

या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना ६ किंवा ८ भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरुन हरकत घेऊ शकेल अशी माहिती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू