मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत! बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; लोकल आणि मेट्रोवरील अतिरिक्त ताण वाढणार

संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी 18 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्टच्या विद्यमान कर्मचाऱ्यांबरोबरच, खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वेट लीज बसमधील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडल्या जातील.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून परिणाम होणार आहे. कारण मुंबईतील बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनेने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज म्हणजेच मंगळवार १८ ऑगस्टपासून परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सकाळी ११.३० वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट बससेवेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या हजारो मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे.

मागण्या काय आहेत?

संघटनेने 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील वेतन करारांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीही केली आहे.

वेट लीज कर्मचाऱ्यांसाठी समान वेतनाची मागणी बेस्ट कामगार संघटनेने वेट लीज व्यवस्थेअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. युनियनची मागणी आहे की, या कर्मचाऱ्यांना ‘समान कामासाठी समान वेतन’ या तत्त्वानुसार वेतन आणि लाभ दिले जावेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि इतर अंतिम देयके वेळेवर देण्याचीही त्यांची मागणी आहे. युनियनने बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दाही उपस्थित केला असून, त्याच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक निधीला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

मुंबईकरांसमोर प्रवासाचे संकट

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील अनेक मार्गांवरील बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागू शकतो. कारण लोकलनंतर बेस्ट ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे संपाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. बससेवा कमी झाल्यास लोकल, मेट्रो, मोनोरेल, टॅक्सी आणि रिक्षांवर अतिरिक्त प्रवासी भार येऊ शकतो.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास…

    Leave a Reply

    You Missed

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू