तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

नाशिकमील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे.त्याने भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण करुन त्यांच्या अत्याचार केले. त्याबाबतचे अशोक खरातचे अनेक व्हिडीओ समोरही आले.त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अशोक खरात प्रकरणी आज मोठी सुनावणी होणार आहे. खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय होणार 

या प्रकरणाबाबत नवनवीन माहिती समोर येतच आहे. अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक नवनवीन खुलासे चौकशीतून समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात ही महत्त्वाची सुनावणी होणार असून लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात आहे. त्याच्याविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यापैकी १२ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.

आज होणार कोर्टात सुनावणी

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अशोक खरात प्रकरणात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. अशोक खरात प्रकरणात ॲड. निकम पहिल्यांदाच सरकार पक्षाची बाजू मांडणार आहेत. सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती. तपास यंत्रणेकडून पुरावे आणि साक्षीदारांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.

जामीन अर्जाला जोरदार विरोध होण्याची शक्यता

सरकार पक्षाकडून खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जावर निर्णय घेणार आहे. पीडितांसह नाशिककर आजच्या सुनावणीच्या निष्कर्षाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

खरातचे तुरुंगात विचित्र चाळे

अशोक खरातच्या या विचित्र वागण्यामुळे पोलीस यंत्रणाही थक्क झाली आहे. कोठडीत बसून मंत्रजप करणे, विचित्र पुटपुटणे आणि स्वतःच्या कृत्यांचे दैवी विधी म्हणून समर्थन करणे, यावरून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, नाशिक पोलिसांनी तसेच एसआयटीने त्याचा कसून तपास सुरुच ठेवला आहे.

दरम्यान आज सोमवारच्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय जामीन अर्जाबाबत काय निर्णय घेते, याकडे पीडितांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.…

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात धडक कारवाईचा सपाटाच लावला आहे. छोट्या हॉटेलपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत, तसेच दुकानापासून ते मंत्रालयपर्यंत तर,कोर्टापासून ते अगदी पानटपरीपर्यंत सर्वच ठिकाणी धडाधड धाडी टाकत तुकाराम मुंढेंच्या FDA…

    Leave a Reply

    You Missed

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    कोर्टात नेमकं काय घडलं! वकीलच राहिले गैरहजर, अशोक खरात जामीन अर्जाबाबत काय निर्णय?

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    तुकाराम मुंढेंच्या FDA ची थेट भाजप बैठकीत ‘सरप्राइज एन्ट्री’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत धाडसत्र, अन्नाचे नमुने घेतले ताब्यात!

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिक संपेना! भरधाव ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; एकाचा मृत्यू तर १० प्रवासी जखमी

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    तुरुंगात मंत्रजप अन् विचित्र चाळे! भोंदू अशोक खरात प्रकरणी आज मोठा निर्णय; जामीन अर्जावर आज सुनावणी,उज्ज्वल निकम…

    पोईसर जिमखान्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत युवा खेळाडूंचा गौरव

    पोईसर जिमखान्यात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत युवा खेळाडूंचा गौरव

    एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

    एव्हरेस्ट आणि लालजी गोढू हिंगाच्या विक्रीवर FSSAI चे तात्काळ बंदीचे आदेश; निकृष्ट दर्जा आणि चुकीचे लेबलिंग

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    नेपाळमधील विध्वंसक प्रलय! देवीघाट प्रकल्प बाधित, जलविद्युत प्रकल्पांत ५०० जण अडकले तर, भारताला होणारा वीजपुरवठा निम्म्यावर

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    मालाड पश्चिममध्ये मतदारांच्या तुलनेत सर्वाधिक ३८.६० टक्के मतदार पडताळणीबाहेर; तर, वर्सोवामध्ये ३८.५१ अन् अंधेरी पश्चिममध्ये ३६.४६

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित

    खारघरमधील धक्कादायक प्रकार, झेरॉक्स सेंटरमध्ये सापडले ३,४०० SIR मतदार अर्ज; ५ बीएलओ निलंबित