आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई पश्चिम उपनगरातील आरे मेट्रो स्टेशनखाली एका खाजगी बसला अचानक आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या आरे मेट्रो स्थानकाखाली महादेव ट्रॅव्हल्स  कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग लागली. ६.१५ वाजता हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

आरे मेट्रो स्टेशनच्या खाली एका बेस्ट बसला अचानक भीषण

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव येथे एक अत्यंत थरारक अशी घटना घडली आहे. आरे मेट्रो स्टेशनच्या अगदी खाली उभ्या असलेल्या एका बेस्ट बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महादेव ट्रॅव्हल्स कंपनीच्या स्लीपर कोच बसला ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीने अवघ्या काही मिनिटांत रौद्ररूप धारण केलं अन् संपूर्ण बेस्ट बस जळून खाक झाली आहे.

आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट थेट वर मेट्रो स्टेशनपर्यंत

आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट थेट वर असणाऱ्या मेट्रो स्टेशनपर्यंत येत असल्यानं परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे.

मेट्रो प्रशासनाने तात्काळ पावले उचलली

मेट्रो लाईन 7 वर धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. मेट्रो सेवा सुरू असली, तरी जोपर्यंत धूर पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत खबरदारी म्हणून दोन प्रमुख मेट्रो स्थानकांवर मेट्रोचा थांबा दिला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वेगाने सुरू झालं. अखेर बसला लागलेली आग सध्या विझवण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, मात्र या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याचे लक्षात येतात चालकाने ही बस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका बाजूला लावली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे म्हटले जात आहे. ही महादेव ट्रॅव्हल नावाची ही बस स्लिपर बस आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आग नेमकी कशी लागली, का लागली या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गावर ऐन वर्दळीच्या ठिकाणी बस जळाल्यामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहने थांबवण्यात आल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस आणि वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    ५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी…

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीतील एका नामांकित रुग्णलयात महिलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागून त्या अग्नितांडवात ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्यीची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शहरातील…

    Leave a Reply

    You Missed

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत