सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळात बोलणी फिस्कटल्याचं बोललं जात आहे. जरांगे आणि सरकार यांच्यातील चर्चेमध्ये एकमत होताना दिसत नाहीये.जरांगे यांनी आंतरवाली सराटीतून त्यांनी काल सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईत मराठा आंदोलकांसह जाणार असल्याचं जरांगेंनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगेमधील विसंवादाची दरी वाढल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत मराठा मोर्चा धडकणार

मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं.आता माघार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या 12 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचं याचा मुहूर्त म्हणजेच त्याची तारीख ठरणार आहे. याविषयीची माहिती जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना थोड्यावेळापूर्वी दिली.

शिबिरं नेमकं कशासाठी?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या तपासणी शिबिरांच्या उद्देशावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचसोबत त्यांनी आंदोलकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरही तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की, “आपलं आपल्याला मिळत नाही. सरकार जाणून बुजून हे करणार आहे. हे शिबिर फक्त आंदोलनापुरतं राबवलं जाणार आहे की आणखी काही उद्देशाने किंवा मिळालेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी हे शिबीर काही जणांच्या सल्ल्याने ठेवलं आहे ते बघू” असा संशय व्यक्त करत जरांगेनी सरकारवरच तोफ डागली.

सरकारच्या शिष्टमंडळावर निशाणा

पुढे ते म्हणाले, “3 वर्षात मी कुणाचीही वाट बघितली नाही. मी माझ्या जीवावर आंदोलन करतो यायचं तर या. मुंबईत आम्ही जाणारच. 12 तारखेला जाहीर करणार. सरकारला मार्गदर्शकाच मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा चांगला आहे. हे त्यांना कळेल. माझं कर्तव्य मि पार पडत आहे. मी लढायचं ठरवलं आहे. त्यांच्याजवळचे 2-3 जण चांगले आहे. यांच्या सल्लागाराचे नाव आम्हाला माहीत झाले आहेत,” अस म्हणत जरांगे टोला लगावला.

शिंदे-शिरसाट यांच्यावर टीका

“आधी चांगली भाषा वापरत होतो. 3 वर्ष शिंदेंना चांगला बोललो. पण आता हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे. शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदें आणि माझे संबंध खराब झाले. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात.सरकारला नाही तुम्हाला शिव्या दिल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चूक केली त्यामुळे बोलणार. मी पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार” असेही जरांगे पाटील म्हणाले.

जरांगेंनी त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडून अखेर मराठ्यांचे भगवं वादळं लवकरच मुंबईत येऊन धडकरणार असल्याचं जरांगेंनी ठणकावून सांगितलं.त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांत मुंबईत काय चित्र पाहायला मिळणार, आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे .

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै…

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    Leave a Reply

    You Missed

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक