पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

सध्या पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे. शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे. पण आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसासंदर्भात एक दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात पावसाने चिंता वाढवली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नसल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जलसाठे धोक्यात आले आहेत. पिकं सुकली आहेत. राज्यात वरुणराजा कधी हजेरी लावणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात कमी दबाचा पट्टा निर्माण

महाराष्ट्रात चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात कमी दबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भापासून पावसाला सुरुवात होणार असून, त्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोर पकडणार आहे. या संदर्भात आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव डख यांचा अंदाज काय आहे?

महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भाकडे आणि पश्चिम विदर्भाकडून मराठवाडा आणि मराठवाड्याकडून उत्तर महाराष्ट्राकडे जात आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस शेतातील पिकांसाठी जीवदान ठरणार आहे. राज्यामध्ये 11 सप्टेंबर रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 11 तारखेला चांगला पाऊस होणार आहे. त्यानंतर बारा सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी हा पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ कव्हर करणार आहे. त्यानंतर या पावसाची मराठवाड्यात एन्ट्री होणार आहे. 13, 14 आणि 15 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा चांगला जोर राहणार असून, मराठवाड्यातून हा पाऊस उत्तर महाराष्ट्र आणि पुढे मुंबईत प्रवेश करणार आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘या’ राज्यांना पावसाच हाय अलर्ट

दरम्यान 11 सप्टेंबर रोजी 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, झारखंड, अरुणाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मेघालय, मिझोरम या राज्यांचा समावेश आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    गणेशोत्स तसेच पुढे येणाऱ्या सर्वच सणांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सर्वच वस्तूंची मागणी वाढताना दिसते. त्यात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई करायला…

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 13वा दिवस आहे.दरम्यान जरांगेंनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईत मराठा मोर्चा धडकणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मराठा आंदोलक मनोज…

    Leave a Reply

    You Missed

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    झुरळे,उंदीर,चिकट फरशी अन् अस्वच्छता! FDAचा दणका; ठाण्यात फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 कारखान्यांना कामबंदीचे आदेश, 20 लाखांचा माल जप्त

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    पंजाबराव डख यांचा नवा अंदाज! दुष्काळाचे सावट संपणार; ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता,हवामान विभागाचा २५ राज्यांना अलर्ट

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    सरकारसोबतची चर्चा फिस्कटली! ‘या’ तारखेला मुंबईत भगवं वादळ धडकणार;जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    वर्सोवा-मढ पुलाचा मार्ग मोकळा! हायकोर्टाची मंजुरी, दीड तासाचा प्रवास आता अवघ्या ५ मिनिटांत; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ताण कमी होणार

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच!किटकांचा वावर, तुंबलेले नाले अन्…जुहू येथील प्रसिद्ध ‘इस्कॉन’च्या ३ रेस्टॉरंट्सवर एफडीएची कारवाई, थेट परवाने निलंबित

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    एम-सील अन् काचेच्या पट्ट्यांनी टिकवलाय पूल? नागोठाणे उड्डाणपुलाच्या व्हायरल व्हिडीओचं खरं कारण अखेर समोर, सुरक्षेबाबत प्रश्न?

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा; के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर,  १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता