मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत असला तरी हवामानातील बदल कायम आहेत. आज, 9 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील काही भागांत सकाळनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उपलब्ध हवामान अंदाजानुसार राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या दुष्काळाचे सावट

सध्या दुष्काळाचे सावट मात्र राज्यावर कायम आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस पाऊस नसणार असल्याचा अंदाज दिला. जुलै महिन्यात राज्यात पाऊस चांगला झाला. चार दिवसानंतर राज्यात पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. काही भागात स्थिती अत्यंत भयंकर असून धरणे कोरडी पडली आहेत. पाणी पातळी घटताना दिसत आहे.

भारतातील मान्सूनबाबत धडकी भरवणारी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात पावासाची अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये 45 दिवस पाऊस गायब आहे. मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत. हवामान विभागाने भारतातील 21 राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत कसं असणार वातावरण?

मुंबईत काहीसं ढगाळ वातावरणासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण सामान्य स्वरुपातच असणार आहे. तसेच पाऊस गायब झाला असून मुंबईतील तापमानात मात्र वाढ होताना पाहायला मिळत आहे. मुंबईकर पुन्हा एकदा उन्हाळ्यासारखं तापमान अनुभवत असून वातावरणातील गर्मी वाढत चालली आहे.

पुण्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान सुमारे 30 ते 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 ते 22 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर, कोरेगाव आणि पाषाण परिसरासाठी हवामान विभागाच्या अंदाजात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या मात्र पुणे जिल्ह्यासाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

पावसाचा जोर सर्वत्र सारखा राहणार नसून स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेणे योग्य ठरेल.

महाराष्ट्रात सध्या मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारतीय हवामान विभागाच्या 9 सप्टेंबरच्या प्रादेशिक अंदाजानुसार कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी आज कोणताही मोठा हवामान इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आज राज्यात व्यापक स्वरूपाच्या मुसळधार पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे.मात्र, हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असेही नाही. स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कायम आहे.

पुढील काही दिवसांत काय स्थिती?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 11 सप्टेंबरनंतर राज्यातील काही भागांत पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. 11 सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वातावरण निर्माण होऊ शकते. त्यानंतर 12 आणि 13 सप्टेंबरच्या आसपास राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.

मध्य महाराष्ट्रात 12 सप्टेंबरला मेघगर्जना आणि विजांचा इशारा असून 13 सप्टेंबरला मुसळधार पावसासह वादळी वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातही 12 सप्टेंबरला मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरणाचा अंदाज आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पावसाची शक्यता

राज्यात गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 12 ते 15 सप्टेंबरदरम्यान पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तुलनेने अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचे वारे कमकुवत

एकंदरीतच महाराष्ट्रात मान्सूनचे वारे कमकुवत झाले आहेत. यामुळ महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रतल घाट माथ्यावर अचानक पावसाचा जोर वाढू शकतो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत तुरळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा;के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबईतील अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम आणि ओशिवरा यांसारख्या महत्त्वाच्या आणि उच्चभ्रू भागांचा समावेश असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या के/वेस्ट वॉर्डच्या कारभारावर एकामागून एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    विभागीय ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांच्याकडे केलेला अर्ज हा तृतीयपंथीय व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक अत्यंत…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा;के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबई पालिकाबाबत लाचखोरीचा संशय?जन्मनोंदीचा मोठा घोटाळा;के/वेस्ट वॉर्डात एका पाठोपाठ एक ACB च्या धाडी, अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर, १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबईत उकाड्याचा तडाखा! महाराष्ट्रात पावसाची विश्रांती,सध्या दुष्काळाचे सावट तर,  १२ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    सोनाली चौकेकरांच्या पाठपुराव्याला यश! ट्रान्सजेंडरना घरभाडे, खरेदी व प्रवेश नाकारणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई; विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील यांचे आदेश

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    मनोज जरांगेंची तब्येत खालावली;सरकार अलर्टवर,मध्यरात्री अडीच वाजता मंत्र्यांचा जरांगेंना फोन अन् लगेच वर्षा बंगल्यावर नेत्यांची बैठक

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    “काटे खोलवर रुतले, तरी…” धनंजय मुंडेंचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल;राजकारणात दणक्यात एन्ट्रीची तयारी?

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा झटका! ८ सप्टेंबरला मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक;’या’ गाड्या रद्द तर काहींच्या वेळेत बदल

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    पत्त्यासारखी कोसळलेल्या हॉस्टेलची इमारतीचा VIDEO समोर!आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान