‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी संवाद साधला. तेव्हा त्याने बाप्पाच्या आगमनाची तयारी तसेच गणेशोत्सवातील त्याच्या लहानपणाच्या आठवणी देखील सांगितल्या.
अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन
बाप्पाचं स्वागत करणं हा त्याच्यासाठी वर्षातील सर्वांत मोठा आनंद असल्याचं त्याने सांगितलं. अमित म्हणाला की,”बाप्पाला घरी घेऊन जाणं म्हणजे सर्वात मोठा आनंद असतो. आमच्याकडे २ दिवस बाप्पा विराजमान असतो. खूप मनापासून सर्व तयारी केलेली आहे.” असं म्हणत त्याने बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता व्यक्त केली.
लेकाच्या पसंतीची मूर्ती
तसेच यंदा त्याच्या लेकाच्या म्हणजे रिधानच्या पसंतीची बाप्पाची मूर्ती असल्याचंही सांगितलं. एवढंच नाही तर त्याने यावेळी त्याच्या लहानपणीच्या बाप्पाच्या आठवणी देखील सांगतिल्या.तो म्हणाला, “यावेळेस माझ्या मुलाच्या आवडची मूर्ती यावर्षी आम्ही घरी आणत आहोत.त्याची जशी इच्छा होती तशीच मूर्ती आणली आहे. यावेळेस त्याला बाप्पाला विसर्जन करायचं नाहीये बाप्पाला.” असं म्हणत त्याने त्याच्या मुलालाही बाप्पाच्या आगमनाची किती आतुरता होती हे सांगितलं.
एवढंच नाही तर त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला त्याचे सर्व मिञमंडळी येतात, सर्व एकञ असतात.सर्वञ आनंदाचं वातावरण असतं असंही त्याने सांगितलं. तसेच त्याच्या लेकाला म्हणजे रिधनलाही बाप्पा खूप आवडत असून त्याला सर्व आरती पाठ असल्याचंही त्याने अमितने सांगितलं होतं.
View this post on Instagram
“बाप्पासोबतच्या लहानपणीच्या खूप आठवणी”
एवढंच नाही त्याने त्याच्या लहानपणीच्या खूप आठवणी सांगितल्या. तसेच त्याच्या घरी कधीपासून बाप्पा बसवला जातो हे देखील सांगितलं. तो म्हणाला,”माझ्या बाप्पासोबतच्या लहानपणाच्या खूप आठवणी आहेत. आईबाबांनी आधी ५ वर्षांसाठी बाप्पाची मूर्ती बसवण्याचा संकल्प होता. पण त्यानंतर मी खूप रडलो होतो. मला बाप्पा दरवर्षीच मला माझ्या घरी हवा होता.तेव्हा माझ्या आई-बाबांनी माझ्या इच्छेखातर दरवर्षी बाप्पा बसवायला सुरुवात केली” दरम्यान अमितने तीच परंपरा आजही कायम ठेवली आहे. तो तितक्याच उत्साहात बाप्पाचं स्वागत करतो.
अल्पावधीतच मालिकेनं अन् अमितने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
दरम्यान ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन हे पात्र साकारून अभिनेता अमित भानुशली घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिका आणि सिनेमात काम केलेल्या अमितच्या चाहत्या वर्गात ‘ठरलं तर मग’मुळे भर पडली. या मालिकेमुळे अल्पावधीतच या मालिकेनं अन् अमितने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अमित सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.








