बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

ठाणे एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. फरार इंडियन मुजाहिद्दिनच्या दहशतवादी तारीक खानच्या मुलीला एटीएसने अटक केली आहे. नमिरा तारीक खान असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव असून तिला ⁠मुंब्र्यातून अटक करण्यात आली आहे.बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये प्रवास केल्याचा संशय आहे. आता एटीएसकडून तिच्या फरार आईचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

⁠नमिरा खान ही दोन वेळा बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया येथे जाऊन आली. तिने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. नमिरा ही कुर्ला आणि लखनौच्या पत्तावरुन काढलेल्या बनावट पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबियामध्ये जाऊन दहशतवादी वडिलांना भेटून आली होती. नमिराने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. ⁠तारीक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारीक खान देखील फरार आहे.

ATS दहशतवाद्याच्या पत्नीचाही शोध सुरु 

आता ⁠तपास यंत्रणेकडून शबनम खानचा शोध सुरु आहे. ⁠नमिरा आणि तिची आई मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास होते. ⁠तारीकवर प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुज्जाहिद्दिन, बनावट नोटा, दहशतवादी कृत्य, देश विरोधी कृत्य असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ⁠तारिक गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.

कोण आहे तारिक खान?

तारीक खान (मोहम्मद तारीक अंजुमन हसन) हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो व्यावसायिकदृष्ट्या एक सिव्हिल इंजिनिअर आहे. तो 1998 पासून प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय होता. एवढंच नाही तर तारिक खान हा इंडियन मुजाहिद्दीनमधील रियाज भटकल,यासीन भटकलचा जवळचा सहकारी मानलं जायचं. तारिकने त्याच्या संपर्कातील अनेक तरुणांना पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ट्रेनिंग कँपमध्ये पाठवलं आहे. तो 2006 साली भारत-नेपाळच्या सीमेवर इंडियन मुजाहिद्दीनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सक्रिय होता. तिथेही अनेक तरुणांना ट्रेनिंगला पाठवण्याचा आरोप आहे.

अनेक तरुणांना मोबाईलवरून ट्रेनिंग द्यायचा

पुढे 2007 साली पुण्याच्या कोंढव्यात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित अनेक संशयित दहशतवाद्यांना लपवल्याचा आरोप आहे. त्यावेळी तो देखील तिथेच होता. त्याने अनेक तरुणांना मोबाईलवरून ट्रेनिंग द्यायचा. सध्या नमिराला एटीएसने अटक केली आहे. नमिराचा शोध सुरू केल्यानंतर तिची आई शबनम फरार झाली. एटीएस आता शबनमच्या मागावर आहेत. तिनेही काही दिवसांपूर्वी पासपोर्टचे नुतनीकरण केल्याची माहिती मिळतेय.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतली होती.…

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    महाराष्ट्र शासनाच्या नागरी हक्क संरक्षण विभागाने ‘तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम २०१९’, ‘नियम २०२०’ आणि ‘महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी धोरण २०२४’ अंतर्गत पोलीस प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क,…

    Leave a Reply

    You Missed

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    “१५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; त्यामागे नेमकं काय गौडबंगाल?”; नितेश कराळे मास्तरांचा नागपुरात खळबळजनक आरोप, मतपेट्या बदलल्याचा संशय

    “१५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; त्यामागे नेमकं काय गौडबंगाल?”; नितेश कराळे मास्तरांचा नागपुरात खळबळजनक आरोप, मतपेट्या बदलल्याचा संशय

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी

    ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

    ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

    रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड; स्टेशनवर प्रचंड गर्दी, ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

    रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड;  स्टेशनवर  प्रचंड गर्दी,  ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

    मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

    मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

    ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?

    ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?

    “जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?

    “जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?