ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चपाती, रोटी किंवा इतर सुट्या खाद्यपदार्थांवर वजनाबाबत कोणताही कठोर कायदेशीर नियम लागू होत नाही. पण काही शासकिय योजनांसाठी पदार्थांचे वजन हे फिक्स करण्यात आलं आहे.
जसं की, रोटी/चपाती हा Loose Food / Unpackaged Food मध्ये येतो. त्यामुळे Legal Metrology Act किंवा FSSAI ने वजन fix केलेले नाही. हॉटेलने 20 ग्रॅमची चपाती दिली तरी त्यावर कारवाई करता येणार नाही. • हा कायदा प्रामुख्याने पॅकेज्ड वस्तूंसाठीच (Pre-packed Commodities) लागू होतो.

रेस्टॉरंटमध्ये बनवली जाणारी रोटी ही थेट ग्राहकासमोर सुटी  जाते, तर मेनू कार्डमध्ये त्याची किंमत लिहिलेली असणं बंधनकारक.

तसेच ज्या वस्तूंवर सीलबंद पॅकिंग असते, त्यावर वजन आणि किंमत छापणे बंधनकारक असते. रेस्टॉरंटमध्ये बनवली जाणारी रोटी ही थेट ग्राहकासमोर सुटी म्हणजे Unpackaged दिली जात असल्याने या कायद्याच्या वजनाच्या नियमांत ती बसत नाही. म्हणजे हॉटेलने २० ग्रॅमची रोटी दिली किंवा ५० ग्रॅमची, यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, कारण अन्न सेवा क्षेत्रात पदार्थाचे वजन नव्हे, तर ‘प्रति नग’ किंवा ‘प्रति प्लेट’ यानुसार किंमत आकारण्याची मुभा असते.फक्त मेनू कार्डमध्ये त्याची किंमत लिहिलेली असणं बंधनकारक.

शासकीय योजनांसाठी याबाबतीत वजन ठराविकच

बाजारात सर्वसाधारण पद्धत एक अशी असते, उदा. एक कच्चा गोळा 30 ते 40 ग्रॅमचा असतो. तोच गोळा म्हणजेच चपाती भाजल्यानंतर तिचे वजन 25 ते 35 ग्रॅमच होते. त्यामुळे याबाबत कठोर नियम लागू नाही.

पण शासकीय योजनांसाठी याबाबतीत वजन ठराविकच आहे. त्यात नियमानुसार कोणताही बदल होणार नाही.

मध्यान्ह भोजन (Mid Day Meal)
यात एका चपातीसाठी 50 ग्रॅम गव्हाचे पीठ वापरणे बंधनकारक. त्यामुळे तयार चपाती साधारण 45 ग्रॅम वजनाची होते.

तुरुंग नियमावली (Jail Manual – महाराष्ट्र), नियमांनुसार कैद्यांना दिल्या जाणाऱ्या एका चपाती कशी दिली जाते?

कैद्याला दिली जाणारी चपाती 60 ग्रॅम पीठाची असावी. महाराष्ट्र तुरुंग नियमावली आणि अंगणवाडी किंवा आश्रमशाळांसाठीचे सरकारी निर्णय (GR) या दोन्ही ठिकाणी लाभार्थ्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार आहाराचे विशिष्ट निकष ठरवून दिलेले आहेत. नियमांनुसार कैद्यांना दिल्या जाणाऱ्या एका चपातीसाठी ६० ग्रॅम पीठाचा निकष ठरवला गेला आहे.

अंगणवाडी, आश्रमशाळा

अंगणवाडी किंवा आश्रमशाळांमध्ये 40 ते 50 ग्रॅमची चपाती देण्याचा GR आहे. कारण अंगणवाडीत लहान मुले शक्यतो ६ वर्षे वयाखालील असतात. आणि आश्रमशाळेत शाळकरी मुले असतात. लहान मुलांची पचनक्षमता आणि अन्नाची गरज कमी असते. त्यामुळे त्यांच्या वयाला योग्य ठरेल अशा वजनाची चपाती आणि पोषणमूल्य आहार पत्रकात समाविष्ट केले जाते.

तुम्हाला जर हॉटेलमध्ये खूपच छोटी रोटी मिळत असेल तर काय कराल?

बिलावर वजन,नग लिहिले नसेल तर ग्राहक मंचात तक्रार करू शकता. पण वजन कमी आहे म्हणून FSSAI केस होत नाही, कारण तो फसवणुकीचा प्रकार मानला जातो, कारण ते अन्न भेसळयुक्त असण्याचा प्रकार नाही.

वेटर किंवा मॅनेजरकडे तक्रार करा: सर्वात आधी अत्यंत नम्रपणे वेटर किंवा हॉटेलच्या मॅनेजरला बोलवा. त्यांना सांगा की रोटीचा आकार नेहमीपेक्षा किंवा किंमतीच्या मानाने
खूपच लहान आहे. अनेकदा चांगल्या हॉटेल्समध्ये ते ही चूक मान्य करतात आणि दुसरी मोठी रोटी आणून देतात किंवा त्याचे पैसे आकारत नाहीत.

मेन्यू कार्ड तपासा: काही हॉटेल्समध्ये ‘मिनी रोटी’ किंवा ‘फुलका’ असे पर्याय असतात, ज्यांचा आकार लहानच असतो. तुम्ही चुकून असा काही पर्याय ऑर्डर केला नाही ना, याची खात्री करा.

बिल देताना सवलत मागा: जर त्यांनी दुसरी रोटी देण्यास नकार दिला, तर बिल भरताना मॅनेजरला आकारानुसार किंमत कमी करण्याची (Discount) विनंती करा

पुढील ऑर्डर विचारून द्या: जर तुम्हाला आणखी रोट्या मागवायच्या असतील, तर वेटरला आधीच विचारून घ्या की रोट्यांचा आकार मोठा असेल का. गरज पडल्यास
रिव्ह्यू द्या, जर हॉटेल प्रशासनाने तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, तर तुम्ही ‘Google Maps’ किंवा ‘Zomato’ वर त्या हॉटेलला कमी रेटिंग देऊन तुमचा अनुभव लिहू शकता, जेणेकरून इतर ग्राहकांना याची माहिती मिळेल.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड; स्टेशनवर प्रचंड गर्दी, ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

    रोजी सकाळी सुमारे ०९:३० वाजता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कांजूरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता…

    मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

    आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य रेल्वेमार्गावरील सिग्नल यंत्रणेत प्रचंड मोठा बिघाड झाला आणि मुंबईची लाईफ लाईन बंद पडली ती अद्यापही सुरु झालेली नाही. आता संध्याकाळी ४ वाजून…

    Leave a Reply

    You Missed

    ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

    ग्राहकांनो, चपातीबाबत ‘हे’ अधिकार माहित आहेत का? कैद्यांना दिली जाते वेगळी चपाती, शासकीय योजनांमधील निकष अन् ग्राहकांसाठीच्या महत्त्वाच्या टिप्स

    रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड; स्टेशनवर प्रचंड गर्दी, ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

    रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांची घरी जाण्याची धडपड;  स्टेशनवर  प्रचंड गर्दी,  ठाणे स्टेशनवर प्रवाशांमध्ये हाणामारी

    मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

    मोठी अपडेट! मुंबई लोकलचा खोळंबा सुरुच, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या; वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार?

    ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?

    ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्यानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता! २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईतील वातावरण कसं असणार?

    “जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?

    “जी आग लागायची ती लागलीच….” मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी का डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट?

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    रायगडमध्ये ‘बल्क ड्रग पार्क’वरून वाद! काम सुरु होताच स्थानिक शेतकरी आक्रमक; तर संजय मानाजी कदम यांचा सरकारला थेट इशारा

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करत नाही, तरीही नानांचे अंत्यविधी सूर्यास्तानंतर का करण्यात आले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    नाना पाटेकरांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी अपडेट! नानांच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘इथे होणार’ अंतिम संस्कार, गोव्याहून विशेष विमानाने पार्थिव पुण्यात

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम

    पहाटे ४:२० ला रुग्णवाहिका, ४५ मिनिटे CPR… डॉक्टरांनी सांगितला नाना पाटेकर यांच्या अखेरच्या क्षणांचा संपूर्ण घटनाक्रम