मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

सध्या ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अचानक आलेल्या आजच्या पावसामुळे काहीसा का असेना पण दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके करपली आहेत. दुसरीकडे मुंबईकर ऑक्टोबर हिटने त्रस्त झाले आहेत. उन्हाचा पारा नागरिकांना सहन होत नाहीये. याचदरम्यान मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील दादरसह विविध परिसरात पाऊस

मुंबईतील दादरसहित विविध परिसरात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांनंतर दादरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईतील दादरसह विविध परिसरात पाऊस बरसल्याने सकाळी नोकरी आणि जॉगिंग वॉकसाठी निघालेल्या लोकांची काहीशी तारंबळ उडाली. तर काहींनी पावसाचा आनंद लुटला. अनेक जण ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे अचानक पावसाने हजेरी लावल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला.

ऑक्टोबर हिटपासून दिलासा

मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचे चटके बसत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान थेट 35 अंशाच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. काही भागात तापमानाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. एकंदरित मुंबईत तापमान वाढत असताना सरी बरसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चक्रीवादळामुळे हवामानात बदल

अर्णब चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे तीन दिवस रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय. या अर्णब चक्रीवादळामुळे राज्यावर थेट परिणाम होणार नाही. परंतु वातावरणात मोठे बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिलाय . त्यामुळे तळ कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस येईल. तसेच ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून ढगांच्या गडाडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या प्रकरणावरून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टेंभी नाका…

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाला. विजयाचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    “१५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; त्यामागे नेमकं काय गौडबंगाल?”; नितेश कराळे मास्तरांचा नागपुरात खळबळजनक आरोप, मतपेट्या बदलल्याचा संशय

    “१५ सीसीटीव्ही कॅमेरे दीड तास बंद; त्यामागे नेमकं काय गौडबंगाल?”; नितेश कराळे मास्तरांचा नागपुरात खळबळजनक आरोप, मतपेट्या बदलल्याचा संशय

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी