मुंबईतील जुहू भागात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामुळे नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे. फूटबॉलची मॅच खेळून घराकडे परतत असताना त्याच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन जणांनी चार ते पाच राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमधून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. मात्र त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.
टायगरच्या डाव्या हातावर, खांद्यावर आणि छातीवर जखमा
ही घटना घडल्यानंतर टागर सुरक्षित असल्याचं म्हटलं गेलं. पण त्यानंतरचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात त्याच्या हाताला, खांद्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने टायगर श्रॉफला थेट गोळी लागलेली नाही. मात्र, गोळीबार झाला तेव्हा गाडीची काच फुटल्यामुळे आणि बारुदच्या उडाल्यामुळे त्याच्या डाव्या हातावर, खांद्यावर आणि छातीवर जखमा झाल्या आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये, व्हिडीओमध्ये त्याच्या शरीरावर आणि हातावर पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. उजव्या हाताला बँडेज बांधलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतानाचे टायगरचे फोटो व्हायरल झाले आहेत.माञ या हल्ल्यात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि आणखी एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला
दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री टायगर श्रॉफच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि विचारपूस केली. एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयेशा श्रॉफची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच मुंबईत अशी गुंडगिरी किंवा गँगवॉर खपवून घेतले जाणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.
‘कोणाचीही दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही’
दरम्यान या घटनेबाबत संताप व्यक्त करत शिंदेंनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, की ‘ही घटना धक्कादायक आहे, निंदाजनक आहे. या घटनेमधून एक प्रकारची दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे. टायगर श्रॉफ एक उभरता अभिनेता आहे. त्याला धमकी देऊन, त्याच्या गाडीवर फायरिंग करून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी या घटनेसंदर्भात मुंबई पोलिसांशी देखील बोललो. या घटनेसंदर्भात मुंबई आयुक्तांनी टीम तयार करून तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोरांना जशास तसं त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, कोणाचीही दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही, मुंबईत कलाकारांना घाबरण्याची गरज नाही’ असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.








