 
									मुंबई : काँग्रेस पक्षाने आज आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली असून, तीन वेळा विजयी आमदार असलम शेख यांना सलग चौथ्यांदा मलाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचा तीन वेळा पराभव करून विजय मिळवलेल्या शेख यांचा आत्मविश्वास यावेळीही उंचावलेला दिसतो आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिनाभरापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती, याचा प्रत्यय त्यांच्या तिकीटाच्या घोषणा झाल्यानंतरही दिसत आहे.
शेख यांचा जनाधार वाढत चालला असून, त्यांचे कार्यक्षेत्रातील विकासकामे आणि एकतेचा संदेश हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. त्यांनी जनतेत सातत्याने संपर्क ठेवून विकासकामांची माहिती दिली आहे आणि त्यावर भर दिला आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते, या निवडणुकीत शेख यांना 35 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळणार आहे.
मालाडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवणारे असलम शेख यांचा भाजपला सतत पराभूत करण्याचा इतिहास लक्षात घेता, या निवडणुकीतही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 Pankaj Helode
Pankaj Helode









