मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये 117 मिमी, बारामतीत 104.75 मिमी, तर इंदापूरात 63.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बारामतीमध्ये 25 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून वाचविण्यात आले असून, फलटणमध्ये तब्बल 163.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तेथे एनडीआरएफची एक टीम तैनात असून, दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या 30 नागरिकांना निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात 6 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यात वीज पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 24 तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या, 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या आणि 5 ठिकाणी इमारतींच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलीस व एनडीआरएफच्या 5 टीम्स पूर्ण सज्ज आहेत.

हवामान खात्याने मुंबईसह कोकण विभागात पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, महसूल व गृह विभाग यांना तातडीच्या उपाययोजनांसाठी नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून कार्यरत राहण्यास सांगितले आहे.

तसंच जलसंपदा विभागाशी सतत समन्वय राखण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार पावसामुळे निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे स्पष्ट संकेत यामधून मिळत आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश मुंबई : राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम सुरू केली आहे.…

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    लातूरमधील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाकडून मिळालेला बैल व गावकरी     लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील एका गरीब शेतकऱ्याची व्यथा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. काशिनाथ गायकवाड…

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द